अरूण जेटली या प्रश्नाने अचानक भडकले

अहमदाबादमध्ये मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी  देशातील पहिली बुलेट ट्रेनचे भूमीपूजन केलं.

Updated: Sep 24, 2017, 08:37 PM IST
अरूण जेटली या प्रश्नाने अचानक भडकले title=

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना एकाने पत्रकार परिषदेत अचानक मध्येच प्रश्न विचारला, अर्थात अरूण जेटली हे बुलेट ट्रेन या विषयावरच बोलत होते, अरूण जेटली यांना यावेळी एकाने प्रश्न विचारला, बुलेट ट्रेनला हिंदीत काय म्हणतात, आणि ते हिंदीतच सांगा बुलेट ट्रेनला हिंदीत काय म्हणतात.

यावर काही वेळ थांबून, अरूण जेटली म्हणाले, जरा गंभीर व्हा, असं यावेळी अरूण जेटली यांनी संतापात सल्ला दिला, मात्र प्रश्न विचारणाऱ्याने सरबत्ती सुरूच ठेवली होती, त्याबाजूने पुन्हा आवाज आला, हा प्रश्न तसा गंभीरच आहे, असं प्रश्न विचारणाऱ्याने सांगितलं, मात्र तो प्रश्न टाळत अरूण जेटलींनी पुढे बोलण्यास सुरूवात केली.

दरम्यान, अहमदाबादमध्ये मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी  देशातील पहिली बुलेट ट्रेनचे भूमीपूजन केलं.