मी तर गाढव; कोर्टात मीडियाच्या प्रश्नावर भडकले आसाराम

आश्रमातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचर केल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेले अध्यात्मीक गुरू असाराम बापू आज मीडियावर चांगलेच भडकले. मीडियासमोर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 14, 2017, 11:03 PM IST
मी तर गाढव; कोर्टात मीडियाच्या प्रश्नावर भडकले आसाराम title=

जोधपूर : आश्रमातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचर केल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेले अध्यात्मीक गुरू असाराम बापू आज मीडियावर चांगलेच भडकले. मीडियासमोर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले.

असाराम बापूंना खटल्याच्या सुनवाईसाठी न्यायालयासमोर गुरूवारी हजर करण्यात आले. तेव्हा मीडियाने त्यांना अखाडा परिषदेने ढोंगी बाबाच्या यादीत टाकल्याबद्धल प्रतिक्रीया विचारली. तेव्हा असाराम बापू मीडियावर चांगलेच संतापले. तसेच, संतापाच्या भरात त्यांनी स्वत:ला गाढव म्हणून घेतले.

न्यायालयात जाण्यापूर्वीच असाराम बापूंना मीडियाने प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. तेव्हा असाराम बापूंनी म्हटले मी संत नाही ना कथावाचक. मी तर गाढव आहे. तुम्ही स्वत:लाच गाढव का म्हणवून घेता असे पत्रकारांनी विचारले असता, ते संतापून स्वत:शिच काही पुटपूटले आणि निघून गेले.