हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक

हिमाचल प्रदेशमध्ये येत्या 9 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणारायत... तर 18 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणाराय.. निवडणूक आयोगानं याबाबतची घोषणा गुरूवारी केली. 

Updated: Oct 12, 2017, 10:58 PM IST
हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये येत्या 9 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणारायत... तर 18 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणाराय.. निवडणूक आयोगानं याबाबतची घोषणा गुरूवारी केली. 

18 डिसेंबरआधीच गुजरात विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत. त्या निवडणुकीच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील. एका राज्यातील निवडणुकीचा परिणाम दुस-या राज्यावर होऊ नये, यासाठी 18 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. जोटी यांनी दिली. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच दिवशी मतदान होणार असून, त्याबाबतची निवडणूक आचारसंहिता आजपासून लागू झाली.

हिमाचलमध्ये सध्या काँग्रेसच्या वीरभद्र सिंग यांचं सरकार आहे. 68 आमदारांच्या या विधानसभेत काँग्रेस विरूद्ध भाजप असा सामना रंगणार आहे... नजर टाकूयात हिमाचल प्रदेशमधील सध्याच्या पक्षीय बलाबलावर...