Assemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने  विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 18, 2017, 12:12 PM IST
Assemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय title=

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुजरातमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळवून दिले. तसेच काँग्रेसच्या टक्केवारीत चांगली वाढ झाली. लोकसभेच्या तुलनेत तब्बल ८ टक्के मतांनी वाढ झाली. तर भाजपची केवळ १ टक्का मतांनी वाढ झाली. त्यामुळे भाजपला चिंता करायला लावणारी ही निवडणूक म्हटली जात आहे. तर काँग्रेससाठी अच्छे दिन ठरणारी ही निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. मात्र, गुजरातकडे लक्ष देताना हिमाचलमधील सत्ता गमवावी लागली आहे. त्यामुळे राहुल गांधीपुढे आता मोठे आव्हान असणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना सुरुवातीला आघाडी मिळवता आली नाही. ते ६००० मतांनी मागे पडले होते. मात्र, त्यांनी अखेर काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरू यांचा १५,४४२ मतांनी पराभव केला. रुपाणी यांच्या विजयामुळं भाजपचा जीव भांड्यात पडलाय.

 

- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी राजकोट पश्चिम मतदार संघातून विजयी

- गुजरात विधानसभा - एकूण जागा : १८२ , भाजप : १०१, काँग्रेस  : ७६, अपक्ष/इतर  : ५

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभेत हसतमुखाने 'व्हिक्ट्री साइन', गुजरातमधील विजयाचा आनंद केला व्यक्त

- गुजरातमध्ये भाजपच्या मतांना १ टक्का तर काँग्रेसच्या मतांत अडीच टक्क्यांनी वाढ

- हिमाचल प्रदेश विधानसभा - एकूण जागा ६८ : भाजप ४२, काँग्रेस २३ जागांवर आघाडी 

नागपूर । अजित पवार यांची प्रतिक्रिया -
 गुजरात आणि हिमाचलच्या जनतेने दाखवून दिले आपण म्हणू ते जनता मान्य करणार नाही,  निवडणुकीच्या सुरुवातीला ही निवडणूक एकतर्फी असल्याचे अनेक जण सांगत होते, पण राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने जे काम केले त्यातून काहीसे वेगळे चित्र निर्माण झाले आहे, दोन्ही राज्याच्या निकालानंतर सर्वच विरोधी पक्षालाही एक नवी दिशा मिळाली आहे.

नागपूर ।  अजित पवार यांची प्रतिक्रिया -
जनतेच्या मनात आल्यानंतर जनता काय करू शकते हे दिसून आले, आपण म्हणू ती पूर्व दिशा हे जनता मान्य करत नाही हे दिसून आले, कार्यकर्त्यांमध्ये एक नवी प्रेरणा या ठिकाणी दिसून आले

- नागपूर । राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाजपवर टीका, गुजरात निवडणुकीवर जनतेचा रोष असल्याचे स्पष्ट, १५१ जागा मिळण्याचा दावा करणाऱ्या भाजपला जनतेने योग्य तो धडा शिकवलाय

- हिमाचल प्रदेश विधानसभा - एकूण जागा ६८ :  ४०, भाजपः  काँग्रेस  : २२ , अपक्ष/इतर : ५

- गुजरात विधानसभा - एकूण जागा : १८२ , भाजप : १०३, काँग्रेस  : ७३, अपक्ष/इतर  : ६

- हिमाचल प्रदेश विधानसभा - एकूण जागा ६८ :  एकूण जागा : ३९, भाजपः  काँग्रेस  : २३ , अपक्ष/इतर : २

- गुजरात विधानसभा - एकूण जागा : १८२ , भाजप : १०६, काँग्रेस  : ७२, अपक्ष/इतर  :  ४

- गुजरात निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शक्तिसिंग गोहील १३५५ मतांनी आघाडीवर

- गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चांगले यश, काँग्रेसची भाजपला कडवी झुंज

-  मुंबई । काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या यशामध्ये भाजपचा निष्क्रीयेचा 'हात' - शिवसेना खासदार संजय राऊत

- गुजरात विधानसभा - एकूण जागा : १८२ , भाजप : १००, काँग्रेस  :  ८०, अपक्ष/इतर  :  २

- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ : भाजप ४०, काँग्रेस २२, इतर ४ जागांवर आघाडीवर

- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ७६०० मतांची घेतली आघाडी

- गुजरात विधानसभा - एकूण जागा : १८२ - भाजप : ९०, काँग्रेस  :  ८८, अपक्ष/इतर :  ३ जागांवर आघाडीवर

- हिमाचल प्रदेश विधानसभा - एकूण जागा :  एकूण जागा : ६८ - भाजप : ३६  काँग्रेस  : २१ , अपक्ष/इतर : ३ जागांवर आघाडीवर

- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - हिमाचलमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री विदर्भ सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य शिमला येथून १३१६ मतांनी आघाडीवर 

- गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी  पिछाडीवर पुन्हा आघाडी घेतली घेतली असून १८०० मतांनी ते पुढे आहेत

- हिमचाल प्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमाल आघाडीवर

- हिमाचल प्रदेशमध्ये भाजप २९ तर काँग्रेस २१ तर १ जागेवर अपक्ष उमेदवारांनी घेतलेय आघाडी

- भाजपचे उमेदवार नितीनभाई पटेल ३००० मतांनी पुढे

- गुजरातमध्ये काँग्रेसने चमत्कार केला, ९० जागांवर घेतली आघाडी, भाजप पिछाडीवर ८२ जागांवर भाजप पुढे

- नागपूर । नागपूर भाजप विधिमंडळ कार्यालय पडले ओस 

- मुंबई ।  मुंबई भाजप कार्यालय पडले ओस , काँग्रेसने घेतलेली आघाडी भाजपा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसतेय नाराजी, अजूनही भाजप कार्यकर्त्यांना आघाडीची आहे आशा  

- गुजरात पोरबंदरमधून काँग्रेसचे उमेदवार Arjun Modhwadia आघाडीवर

- गुजरात निवडणुकीचा शेअर बाजारावर मोठी परिणाम, शेअर मार्केट कोसळला, सेन्सक्स ७२९ अंकानी कोसळला, भाजपला मोठा फटका बसल्याने शेअर मार्केटवर परिणाम

- गुजरातचे मुख्यमंत्री  विजय रुपाणी हे ८०० मतांनी मागे असून भाजप प्रदेश अध्यक्षही पिछाडीवर आहेत. भाजप ८२ जागांवर तर काँग्रेस ८८ जागांवर आघाडीवर आहे.

- हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे, काँग्रेस पिछाडीवर

- गुजरातमध्ये भाजपला दणका, मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि प्रदेश अध्यक्ष पिछाडीवर, काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली

- गुजरातमध्ये भाजपला जोरदार दणका, उत्तर प्रदेशमध्ये होमहवन आणि प्रार्थना सुरु

- काँग्रेसने गुजरातमध्ये जोरदार आघाडी घेत भाजपला टक्कर दिलेय, काँग्रेसच्या गोठात उत्साहाचे वातावरण

- गुजरातमध्ये भाजप ८७ जागांवर तर काँग्रेस ७० जागांवर घेतली आघाडी

- गुजरातमध्ये भाजप ९२ तर काँग्रेस ६० जागांवर आघाडीवर, भाजपकडे सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडी कायम

- गुजरातमध्ये काँग्रेस जोरदार मुसंडी, ५९ जागांवर काँग्रेसची आघाडी, भाजप ८६ जागांवर पुढे

- हिमाचल प्रदेशमध्ये २६ जागांवर भाजपला आघाडी तर १० जागांवर काँग्रेस पुढे

- काँग्रेसने आधीच्या निवडणुकीपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी, काँग्रेस ४९ जागांवर आघाडी, भाजप ७७ जागांवर आघाडी

- भाजपची आघाडी कायम, ७६ जागांवर आघाडी काँग्रेसचीही जोरदार मुसंडी ४६ जागांवर आघाडी

- गुजरातमध्ये भाजप ७२ जागांवर आघाडीवर काँग्रेस ४५ जागांवर आघाडीवर

- हिमाचल प्रदेशमध्ये भाजप ९ तर काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर

- गुजरातमध्ये ओबीसी नेते अल्पेश ठाकोर पिछाडीवर, मुख्यमंत्री विजय रुपाणी आघाडीवर

- गुजरातमध्ये भाजप ५२ तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर, गुजरातमध्ये जोरदार चुरस

- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ३, काँग्रेस २ जागांवर आघाडीवर

- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ३ तर काँग्रेस एक जागेवर आघाडी

- गुजरातमध्ये काँटेकी टक्कर, भाजप २५ आणि काँग्रेस २२ जागांवर आघाडीवर

- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी राजकोट पश्चिममधून आघाडीवर

- काँग्रेसने ४ जागांवर आघाडी घेतली असून भाजप १३ जागांवर पुढे आहे

हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ३ तर काँग्रेस एक जागेवर आघाडी

हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - पहिला कल हाती, दोन जागांवर भाजप आघाडीवर

हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - ६८ जागांवरील मतमोजणीला सुरुवात

- भाजपची सुरुवातीपासून आघाडी, भाजप ८ तर काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर

- भाजप ६ जागांवर तर काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर

- आणंद जिल्ह्यात बोरसाड विधानसभा निवडणुकीत भाजपचे रमणभाई सोलंकी आघाडीवर

- गुजरात निवडणूक तयारी पूर्ण, मतमोजणीला सुरुवात

 

काँग्रेस आणि राहुल गांधी यांना 'हार्दिक' शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसे पोस्टर दिसत आहेत.

निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण, थोड्याच वेळात सुरुवात होणार

Assembly election results Live : गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी कसोटीची आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे होमपिच तसेच काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निकालाचे थेट परिमाण ही २०१९च्या लोकसभा निवडणुकीवर होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  

मतदानोत्तर चाचण्यांनी गुजरातमध्ये भाजप विजय मिळवेल, असे भाकित वर्तविले आहे. तर पाटीदार आरक्षण आंदोलन, शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील नाराजी मतदानयंत्रांतून उमटेल आणि आपण तब्बल २२ वर्षांनंतर सत्तेत येऊ, अशी आशा कॉंग्रेसला आहे.

मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचार धडाक्याने सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान उभे राहिले. गुजरात विकास प्रारूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. राहुल यांच्या मंदिर भेटीचा मुद्दाही चर्चेचा विषय ठरला.