नोकरी गेली तर सरकार देणार आर्थिक मदत, अटलजींच्या नावे योजना

जर तुमची नोकरी गेली तर सरकार तुम्हाला आर्थिक सहाय्यता देणार आहे.

Updated: Sep 20, 2018, 04:51 PM IST
नोकरी गेली तर सरकार देणार आर्थिक मदत, अटलजींच्या नावे योजना   title=

नवी दिल्ली : आपली नोकरी कशी सुरक्षीत राहिलं याच टेन्शन प्रत्येकाला असत. तरी ती वाईट वेळ अनेकांच्या आयुष्यात येते जेव्हा आपली नोकरी गेलेली असते. अशावेळी काय करायच आपल्याला सुचत नाही. पण आता तुमच्यासोबत असं काही झालं तर काळजी करु नका. जर तुमची नोकरी गेली तर सरकार तुम्हाला आर्थिक सहाय्यता देणार आहे. दुसरी नोकरी मिळेपर्यंत ही मदत मिळणार आहे.

अटलजींच नाव 

 एम्लॉई स्टेट इंश्युरन्स कॉर्पोरेशन (ESIC) तर्फे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या योजनेला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आलं आहे. अटल बिमित व्यक्ति कल्याण योजना असे याचे नाव असून याअंतर्गत थेट बॅंक खात्यात रक्कम जमा होणार आहे. 

नवी नोकरी मिळेपर्यंतच 

 एम्प्लॉयी स्टेट इंश्योरन्स अॅक्ट अंतर्गत या योजनेचा लाभ मिळणार आहे. कामगार मंत्री बुधवारी या योजनेला मंजूरी दिली. यासंबधीची माहिती नियम, अटी यांचा फॉर्मेट लवकरच जारी करण्यात येणार आहे. ESIC ने आपल्या डेटाबेसमध्ये आधार सीडिंग करण्यासाठी कंपन्यांना 10 रुपये प्रति व्यक्ती रिएंबसमेंट देण्याचा निर्णय घेतलाय. याचा लाभ नवी नोकरी मिळेपर्यंतच मिळणार आहे. या स्कीमनुसार महिन्याला किती रुपये मिळणार याबद्दल अजून खुलासा करण्यात आला नाही.