अझरुद्दीन पक्षात पुन्हा सक्रीय होणार?

माजी क्रिकेटर अझरुद्दीन यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत अझर यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाही होता. 

Updated: Feb 23, 2018, 05:35 PM IST
अझरुद्दीन पक्षात पुन्हा सक्रीय होणार? title=

नवी दिल्ली : माजी क्रिकेटर अझरुद्दीन यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत अझर यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाही होता. 

या भेटी दरम्यान राहुल गांधी यांनी अझरुद्दीन यांना पक्षात सक्रीय होण्यास सांगितल्याची माहिती समोर येतेय.

२००९ मध्ये मुरादाबाद येथून काँग्रेसकडून अझरुद्दीन यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. मात्र २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी घेतली नव्हती.