'या' ठिकाणी मुलांना दिवाळीत शेणात लोळवले जाते!

 दिवाळी पाडव्याच्या दिवशी देशातल्या इतर राज्यांत गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे.  मात्र मध्य प्रदेशमधल्या बैतुल येथे एक वेगळीच परंपरा आहे. यादिवशी छोट्या मुलांना शेणात लोळवले जाते. असे केल्याने मुलांचे रोगराईपासून संरक्षण होते, अशी या लोकांची मान्यता आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध शेणात झोपवले किंवा लोळवले जाते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 21, 2017, 08:16 PM IST
'या' ठिकाणी मुलांना दिवाळीत शेणात लोळवले जाते! title=
फोटो सौजन्य : ANI

मुंबई : दिवाळी पाडव्याच्या दिवशी देशातल्या इतर राज्यांत गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे.  मात्र मध्य प्रदेशमधल्या बैतुल येथे एक वेगळीच परंपरा आहे. यादिवशी छोट्या मुलांना शेणात लोळवले जाते. असे केल्याने मुलांचे रोगराईपासून संरक्षण होते, अशी या लोकांची मान्यता आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध शेणात झोपवले किंवा लोळवले जाते.

बैतुल गावात गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. यादिवशी गायीच्या शेणाचा डोंगर तयार करून त्यावर झेंडूची फुले वाहतात. त्यानंतर छोट्या मुलांना त्यात झोपवलं किंवा लोळवले जाते. यात अगदी काही महिन्यांच्या बाळांचादेखील समावेश असतो.

सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत ही प्रथा सुरू असते. अनेक मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध शेणात ढकललं जातं. पालकही अनेकदा त्यांच्यावर बळजबरी करतात म्हणून या प्रथेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. स्थानिकांच्या मते, लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि रोगराईपासून त्यांचा बचाव करण्यासाठी ही प्रथा सुरू केली आहे. पण ही प्रथा पूर्णपणे चुकीची असून त्यावर बंदी घालावी अशीही मागणी होत आहे.