बोलेरो गाडी शाळेत घुसली, ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू

रस्त्याच्या बाजूला असलेल्या शाळेत भरधाव गाडी घुसल्याने झालेल्या अपघातात ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 24, 2018, 04:18 PM IST
बोलेरो गाडी शाळेत घुसली, ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू title=

नवी दिल्ली : रस्त्याच्या बाजूला असलेल्या शाळेत भरधाव गाडी घुसल्याने झालेल्या अपघातात ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमधील मुजफ्फरपूर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर २४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, सीतामढी येथे राष्ट्रीय महामार्ग-७७ वर धर्मपुर चौक परिसरात हा अपघात घडला आहे. वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडीने ९ विद्यार्थ्यांना चिरडलं.

बोलेरोच्या धडकेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहेत. सर्व विद्यार्थी ग्रामीण शाळेतून घराकडे परतत होते त्यावेळी अपघात घडला.