बीजेपीने बदलली रणनिती, हार्दिक पटेल आणि काँग्रेसला देणार मात

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राज्यातील १८२ जागांच्या पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी नऊ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. 

Updated: Nov 17, 2017, 11:35 PM IST
बीजेपीने बदलली रणनिती, हार्दिक पटेल आणि काँग्रेसला देणार मात  title=

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राज्यातील १८२ जागांच्या पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी नऊ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. 

पक्षाने ७० उमेदवारांची लिस्ट जाहीर केली. यातील ७० उमेदवारांमध्ये २५ नावे दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीचे आहे. पक्षाने बहुतांशी वर्तमान आमदारांचा पत्ता कट करण्यापेक्षा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. यातील ४९ आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. 

वेगळी रणनिती...

तसेच पक्षाने जातीय समीकरणांवरही खूप लक्ष दिले आहे. सध्या पक्षाने आपला मागील विनिंग फॉर्म्युला बऱ्याच प्रमाणात बदलला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपला साथ देणाऱ्या ८ आमदारांपैकी केवळ ५ जणांना पक्षाने मैदानात उतरविले आहे. 

अजून दुसरी लिस्ट येणे बाकी आहे. यात पाहावे लागेल की पक्ष विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचा आपली भूमिका कायम ठेवते का की नाही. पक्षाने दुसऱ्या यादीत विद्यमान आमदारांना तिकीट दिले तर पक्ष बऱ्याच कालावधीनंतर आपला विनिंग फॉर्म्युला बदलू शकते. 

विनिग फॉर्म्युला बदलला...

हा विनिंग फॉर्म्युला भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा मास्टर स्ट्रोक मानला जायचा. अनेक राज्यांमध्ये भाजपने या फॉर्म्युलाने विजय मिळविला आहे. यूपीमध्ये भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात तिकीट वाटले. 

पक्षाने ही रणनिती २०१४ च्या सार्वजनिक निवडणुकीत आखली होती. त्याचा परिणाम पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. 

काँग्रेस आणि त्रिकुटाला देणार मात

भाजप युवा पाटीदार नेता हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी या त्रिकुटाचा सामना करावा लागत आहे. पक्षाने पाटीदारांचा असंतोष कमी करण्यासाठी पहिल्या यादीत १४ पटेल उमेदवारांना तिकीट दिले आहे. उत्तर गुजरातमधील रणनिती पाहता ठाकोर आणि चौधरी समाजाला फूस लावली जात आहे. यात समाजाचे प्रमुख नेत्यांना पक्षाने पहिल्या यादीत तिकीट दिले आहे. तसेच हार्दिक पटेलचे निकटवर्तीयांना आपल्याकडे वळवण्यात भाजप प्रयत्न करीत आहे. भाजपने पाटीदार अमानत आंदोलन समितीचे नेते चिराग पटेल आपल्याकडे खेचले आहे.