हिमाचाल प्रदेश मुख्यमंत्रीपदाची जयराम ठाकूर घेणार आज शपथ

हिमाचाल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी जयराम ठाकूर हे आज शपथ घेणार आहेत. ऐतिहासिक रिज मैदानात हा शपथविधी पार पडणार असून या शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शाह, माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आणि केंद्रीय मंत्र्यांसह इतर राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

Updated: Dec 27, 2017, 10:11 AM IST
हिमाचाल प्रदेश मुख्यमंत्रीपदाची जयराम ठाकूर घेणार आज शपथ title=

नवी दिल्ली : हिमाचाल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी जयराम ठाकूर हे आज शपथ घेणार आहेत. ऐतिहासिक रिज मैदानात हा शपथविधी पार पडणार असून या शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शाह, माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आणि केंद्रीय मंत्र्यांसह इतर राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

आज सकाळी 11 वाजता हा शपथविधी सोहळा आहे. निवडणुकीआधी भाजपकडून प्रेमकुमार धुमल यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आलं होतं. मात्र या निवडणुकीत धुमल यांचा पराभव झाल्याने त्यांचे नाव मागे पडलं होतं.