पकोडा पॉलिटिक्स: भज्याच्या नावाखाली लोकांना अडाणी ठेवण्याचा भाजपचा डाव - केजरीवाल

केंजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 12, 2018, 09:26 AM IST
पकोडा पॉलिटिक्स: भज्याच्या नावाखाली लोकांना अडाणी ठेवण्याचा भाजपचा डाव - केजरीवाल title=

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष लोकांना चांगले शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनिअर, वकील बनवते. तर, लोकांना अडाणी ठेऊन त्यांना भजी विकायला लावायचे हा भाजपचा डाव असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. केंजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधला आहे.

देशात रंगले 'पकोड पॉलिटीक्स'

पंतप्रधान मोंदीच्या भजीवाल्या वक्तव्यानंतर देशात 'पकोडा पॉलिटीक्स' चांगलेच रंगले आहे. विरोधकांनी पंतप्रधांनावर जोरदार टीकास्त्रत्र सोडले असून, या राजकारणात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उडी घेतली आहे.

आपच्या कार्यकर्त्यांनी तळली भजी

दरम्यान, केजरीवाल यांच्या ट्विटचा परिणाम फरिदाबादच्या रस्त्यांवरही पहायला मिळाला. केजरीवाल यांनी ट्विट करताच आपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर भजी विकून पंतप्रधानांच्या वक्तव्याबद्धलची आपली नाराजी व्यक्त केली. हे तेच भाजप सरकार आहे. ज्यांनी निवडणुकीवेळी रोजागर निर्मितीचे अश्वासन दिले आणि आता लोकांना भजी विकायला लावत आहे, असा आरोपही आपच्या कार्यकर्त्यांनी या वेळी केला.

विरोधकांनी साधला जोरदार निशाणा

दरम्यान, पंतप्रधानांच्या भजीवाल्या विधानावर विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे. यात सर्वात प्रथम काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी पंतप्रधानांच्या या विधानावर टीका केली होती. भजी विकणे हा जर जॉब असेल तर, भीक मागणे हा सुद्धा जॉबच आहे, असे ट्विट चिदंम्बरम यांनी केले होते.