पुलवामात सलूनमध्ये स्फोट, एक जखमी

काश्मीरमधल्या पुलवामातल्या एका सलूनमध्ये स्फोट झाल्यानं एक जण जखमी झाला. या स्फोटात सलूनचही मोठं नुकसान झालं. मात्र चौकशी करण्यासाठी जात असलेल्या पोलिसांवर जमावानं जोरदार दगडफेक केली. त्यामुळं काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. 

Updated: Oct 12, 2017, 10:53 PM IST
पुलवामात सलूनमध्ये स्फोट, एक जखमी

श्रीनगर : काश्मीरमधल्या पुलवामातल्या एका सलूनमध्ये स्फोट झाल्यानं एक जण जखमी झाला. या स्फोटात सलूनचही मोठं नुकसान झालं. मात्र चौकशी करण्यासाठी जात असलेल्या पोलिसांवर जमावानं जोरदार दगडफेक केली. त्यामुळं काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. 

पोलीस घटनास्थळी पोहचू न शकल्यामुळं स्फोटाचं काळ कळू शकलं नाही. तर दुसरीकडं अनंतनाग जिल्ह्यात जम्मू आणि काश्मीर बँकेच्या शाखेर तीन चार जणांनी सशस्त्र दरोडा घातला. 

तीन ते चार बुरखाधारी दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या पाच लाखांचा दरोडा घातला. गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संख्येनं या परिसरात बँकांवर दरोड्याच्या घटना घडल्याचं बँक अधिका-यांनी सांगितलं.