LPG च्या दरात मोठी कपात, सिलेंडर देखील झाले स्वस्त

गृहिणींना आजच्या दिवसातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. आता त्यांच किचन बजेट  जास्त स्वस्त होणार आहे. आणि याला कारण म्हणजे सिलेंडरच्या दरात झालेली कपात. सब्सिडी नसलेल्या सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 2, 2018, 09:00 AM IST
LPG च्या दरात मोठी कपात, सिलेंडर देखील झाले स्वस्त  title=

मुंबई : गृहिणींना आजच्या दिवसातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. आता त्यांच किचन बजेट  जास्त स्वस्त होणार आहे. आणि याला कारण म्हणजे सिलेंडरच्या दरात झालेली कपात. सब्सिडी नसलेल्या सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 

एवढ्या रुपयांनी सिलेंडर होणार स्वस्त 

सब्सिडी नसलेल्या सिलेंडरच्या दरात आता 35.50 रुपये किंमतीने कपात झाली आहे. तसेच 5 किलोचा एलपीजी सिलेंडर देखील 15 रुपये दराने स्वस्त झाला आहे. 19 किलोच्या कर्मशिअल सिलेंडरचा दर 54 रुपयांनी घटला आहे. या अगोदर सीएनजी आणि पाईप गॅसलाईन (पीएनजी) च्या किंमतीत मात्र 1 एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे. यामध्ये 90 पैसे प्रति किलोग्रॅम आणि 1.15 रुपये प्रति घन मीटर वाढ करण्यात आली आहे. सरकारने हा निर्णय दोन वर्षाचा दराचा उच्चांक गाठल्यानंतर घेतला आहे. 

वाहनांत सीएनजी तर घरात पीएनजीची सेवा पूरवणारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड यांनी सांगितले आहे की, दिल्लीत सीएनजीचा भाव हा 40.61 रुपये असणार आहे तर नोएडा आणि गाजियाबादमध्ये हा दर 47.05 रुपये प्रति किलोग्रॅम असणार आहे.