नवरीने दिला नवरदेवाला चोप, फोडला चुडा, उतरवला साज-श्रृंगार

गावकरी इतके संतापले होते की, त्यांनी जेवन करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या हातातील जेवनाची ताडेही हिसकावली. दुसऱ्या बाजूला नवरीने हातातील चुडा फोडला, साज-श्रृंगारही उतरवला आणि नवरदेवाला चपलेने चोप दिला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 26, 2018, 01:03 PM IST
नवरीने दिला नवरदेवाला चोप, फोडला चुडा, उतरवला साज-श्रृंगार title=

बुलंदशहर : घटना आहे उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील ककोड पोलीस ठाणे परिसरातील. इथल्या कोंदू गावात एका नवरीने भर नवरदेवाला चक्क भर मंडपात पायतानाने चोपल दिला. नवरीने हातातील चुडा फोडला आणि साजृ-श्रृंगारही उतरवला. या प्रकारानंतर नवरदेव आणि त्याच्या वडीलांना (वरबाप) पोलिसांच्या हवाली केले.

व्हाट्सपमुळे झाला अडकला नवरदेव

प्राप्त माहितीनुसार, लग्नाच्या बोहल्यावर चढत असताना नवरदेवाच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक मेसेज आला. या मेसेजच्या माध्यमातून नवरेदव हा पुर्वविवाहीत असल्याचे नवरीच्या लक्षात आले. नवरीने जेव्हा हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला तेव्हा, एकच खळबळ उडाली. नवरीकडचे सर्व गाव एकत्र जमले आणि त्यांनी नवरदेवासहीत संपूर्ण वऱ्हाडालाच एका खोलीत डांबून टाकले. ह सर्व घडत असताना गावकऱ्यांनी नवरेदेवालाही चांगलेच बदडले. दरम्यान, काही वेळाने घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांमुळे वऱ्हाडी मंडळींची सुटका झाली.

चाणाक्ष करवलीने केला भांडाफोड

सविस्तर वृत्त असे की, कोंदू गावच्या मुलीसोबत गोठनी गावच्या मुलाचे लग्न ठरले. रितीनुसार गोठणीकर वऱ्हाडी बनून कोंदू गावी हजर झाले. सर्व काही सुरळीत सुरू होते. गावदेवादरम्यान नवरा-नवरी असे उभयपक्षी लोक डॉल्बीच्या तालावर डान्स करत होते. मात्र, नवरदेरदेव जेव्हा मंचावर गेला तेव्हा एका करवलीने त्याचा मोबाईल पाहिला. मोबाईलवर आलेल्या मेसेजवरून ध्यानात आले की, नवरदेवर नोएडातील एका मॉलमध्ये काम करतो. त्याने मॉलमध्ये काम करणाऱ्या एका मुलीसोबत ३ महिन्यांपूर्वीच कोर्ट मॅरेज केले आहे.

नवरीने फोडला चुडा, उतरवला साज-श्रृंगार

हा प्रकार लक्षात येताच भर मंडपातच दे दणादण सुरूवात झाली. गावकरी इतके संतापले होते की, त्यांनी जेवन करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या हातातील जेवनाची ताडेही हिसकावली. दुसऱ्या बाजूला नवरीने हातातील चुडा फोडला, साज-श्रृंगारही उतरवला आणि नवरदेवाला चपलेने चोप दिला.

दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत नवरदेव आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. तर, वऱ्हाडी मंडळींची सुटका केली आहे. पोलीस पुढील तपास करत असून, वृत्त प्रसारीत करे पर्यंत दोन्ही बाजूंची मते जाणून घेत होते. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.