मोदी, योगींच्या नावानं शिव्या... भाजप आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल

ऑडिओमधला आवाज भदोहीचे भाजप आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांच्या मुलाचा?

Updated: Oct 6, 2018, 11:40 AM IST
मोदी, योगींच्या नावानं शिव्या... भाजप आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल title=

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्यानं एका भाजप आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाराणसीमध्ये ही घटना घडलीय. काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या (बीएचयू) एका विद्यार्थ्यांनं ही तक्रार दाखल केलीय. या विद्यार्थ्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध अपशब्द वापरून समाजातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 

व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये एसएसपी आणि डीएम विरुद्धही अपशब्द वापरण्यात आलेत. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑडिओमधला आवाज भदोहीचे भाजप आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांचा मुलगा दीपक त्रिपाठीचा आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय. आमदार त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, हा ऑडिओ फेक आहे... मुलाच्या आवाजाचा वापर करत हा व्हिडिओ बनवण्यात आलाय.