रेल्वे तिकीटावरचे अनुदान एलपीजी प्रमाणे सोडण्याची योजना

रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे तिकीटावर मिळणारे अनुदान सोडण्यातचे आवाहन केंद्र सरकार करणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 6, 2017, 03:23 PM IST
रेल्वे तिकीटावरचे अनुदान एलपीजी प्रमाणे सोडण्याची योजना title=

नवी दिल्ली : रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे तिकीटावर मिळणारे अनुदान सोडण्यातचे आवाहन केंद्र सरकार करणार आहे.

मोदी सरकारने याआधी गॅसवरील सबसिडी गरीबांसाठी सोडून द्या, असे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला मिळालेल्या यशानंतर आता केंद्र सरकार रेल्वे तिकीटावर मिळणारी सबसीडी सोडण्याचे आवाहन करणार आहे. 

पुढील महिन्यापासून ही योजना अंमलात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुरुवातीला राष्ट्रीय वाहतुकदारांना अनुदान सरेंडर करण्यासाठी दोन टप्प्यातली ऑफर दिली जाणार आहे. एकूण सवलतीच्या ५० टक्के किंवा १०० टक्के रक्कम ते सरेंडर करू शकतील. 

राज्यस्तरावरील वाहतुकीतला रेल्वे शुल्काच्या ४३ टक्के खर्च रेल्वे उचलते. या प्रवासी शुल्कातल्या भरमसाठ सवलतीमुळे रेल्वेला दरवर्षी ३० हजार कोटी रुपयांचा तोटा होतो, असे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

आता नव्या योजनेत ऑनलाइन तिकीट बुकिंग किंवा तिकीट खिडकीवरून तिकीट घेतल्यास त्या तिकीटांवर सवलत परत करण्याचा पर्याय उपलब्ध राहील.  ज्या ट्रेन्समधून उच्च मध्यम वर्ग प्रवास करतो, त्या राजधानी आणि शताब्दी सारख्या ट्रेन तिकीटांवर ही योजना आखण्यात आली आहे.