या बदलामुळे जीएसटी आणखी होणार सुटसुटीत

मोदी सरकारने जीएसची लागू केल्यानंतर अनेकांना अडचणीना तोंड द्यावे लागले. तसेच सामान्यांचे कंबरडे मोडल्याचा आरोप

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 1, 2017, 10:31 AM IST
या बदलामुळे जीएसटी आणखी होणार सुटसुटीत  title=

नवी दिल्ली  : मोदी सरकारने जीएसची लागू केल्यानंतर अनेकांना अडचणीना तोंड द्यावे लागले. तसेच सामान्यांचे कंबरडे मोडल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, गुजरात निवडणुकीच्या तोंडावर जीएसटीमध्ये कपात करण्यात आली. आता त्यापुढे जाऊन यात बदल करण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेत.

जीएसटीचे  दोनच टप्पे  

देशात जीएसटीमुळे समान कर प्रणाली लागू  झालेय. याचे फायदे हे भविष्यात मिळतील, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. एकदा महसुलात वाढ झाल्यानंतर वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) दोनच टप्पे ठेवण्यात येतील, तशी वाटचाल सुरु आहे, असे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेत. 

जीएसटी कपातीचे संकेत

लहान व्यवसाय जीएसटीमुळे धोक्यात आलेत. अनेक उद्योग बंद पडल्याची टीका विरोधकांनी केली. या जीएसटीच्या मुद्द्याच्या अंमलबजावणीवरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठल्याच्या पार्श्‍वभूमीवर जेटली यांनी जीएसटी रचनेतील बदलाबरोबरच जीएसटी कपातीचे हे संकेत दिले आहेत.

महसूलात वाढ झाली की...

दैनंदिन वापराच्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी आकारला जातो. जीएसटीचे सध्या ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार टप्पे आहेत. जीएसटीच्या माध्यमातून महसूलात वाढ झाली की जीएसटीची रचना बदलण्यात येईल. जीएसटीचे हळूहळू दोनच टप्पे ठेवण्याचा सरकारचा विचार आहे, असे जेटली  यांनी एचटी लीडरशिपच्या परिषदेत बोलताना सांगितले.

चैनीच्या वस्तूवर जास्तीचा जीएसटी

 मर्सिडीज कार आणि हवाई चप्पल एकाच स्लॅबमध्ये ठेवणे चुकीचे आहे. चैनीच्या वस्तू २८ टक्क्यांमध्येच राहतील. २८ टक्के स्लॅबमधील आणखी काही वस्तू १८ टक्क्यांमध्ये आणल्या जातील. तर १२ आणि १८ टक्क्यांचा स्लॅब एकत्र केला जाईल. याचा अर्थ १२ टक्क्यांतील काही वस्तू आणि सेवा ५ टक्क्यांत, तर १८ टक्क्यांमधील वस्तू १२ टक्क्यांत आणल्या जातील. लघु आणि मध्यम व्यापार्‍यांसाठी जीएसटीची रचना आणखी सोपी करण्याचा विचार असल्याचे जेटली म्हणालेत.