महाराष्ट्र बंद : संसदेत आरएसएसवर मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

भीमा कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधासाठी एकीकडे महाराष्ट्र बंद असताना संसदेतही याचे पडसाद उमटले आहेत.  कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी आवाज उठवला असून दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

Updated: Jan 3, 2018, 02:03 PM IST
महाराष्ट्र बंद : संसदेत आरएसएसवर मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधासाठी एकीकडे महाराष्ट्र बंद असताना संसदेतही याचे पडसाद उमटले आहेत.  कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी आवाज उठवला असून दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

ते म्हणाले की, ‘समाजात फूट पाडण्यात कट्टर हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचे लोक यांचा हात आहे. त्यांनीच हे काम केले आहे’, अशा शब्दात मल्लिकार्जुन खरगे यांनी आरएसएसवर हल्लाबोल केलाय. 

तसेच ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवड करावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गप्प बसू शकत नाहीत. त्यांनी यावर उत्तर द्यावं. ते या मुद्द्यावर मौनी बाबा झाले आहेत’, असे ते म्हणाले.

याआधी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजप आणि आरएसएसवर टीका केली. त्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनीही आरएसएसवर आणि भाजपवर हा हिंसाचार घडवून आणल्याची टीका केलीये. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close