गुजरातमध्ये शिक्षण, आरोग्य सेवा महाग - राहुल गांधी

मोदी हे विकासाबाबत खोटे बोलत आहेत. विकासाचे चित्र रंगवले जातेय, अशी टीका करत गुजरातमध्ये आरोग्य, शिक्षण सेवा महाग आहेत, यावर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोट ठेवले.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 12, 2017, 03:16 PM IST
गुजरातमध्ये शिक्षण, आरोग्य सेवा महाग - राहुल गांधी title=

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाबाबत खोटे बोलत आहेत. विकासाचे चित्र रंगवले जातेय, अशी टीका करत गुजरातमध्ये आरोग्य, शिक्षण सेवा महाग आहेत, यावर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोट ठेवले. राहुल गांधी यांनी अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मोदी गप्प का?

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. अखेरच्या टप्प्यात ९३ जागांसाठी १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. प्रचाराच्या धामधुमीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. मोदी हे भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्या भ्रष्टाचारावर का बोलत नाही. त्याचवेळी विकासाचे चित्र जे रंगवले जात आहे. त्याप्रमाणात विकास झालेला नाही, अशी टीका केली.

विकासाचे व्हिजन तयार

गुजरातमध्ये निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा पाहा. या निवडणुकीत काँग्रेसला विजय नक्की मिळले, असा दावा राहुल गांधी यांनी केला. मोदी यांनी केवळ श्रीमंताना झुकते माप दिलेय. गरीब गरीबच राहिल्याची टीका यावेळी राहुल यांनी केली.  दरम्यान, आमचे गुजरात विकासाचे व्हिजन तयार, अशी माहिती राहुल गांधी यांनी यावेळी दिली.