आता राहुल गांधी यांच्या हायलेव्हल मिटींगमध्ये हसल्या रेणुका चौधरी, नेते नाराज

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान कॉंग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांच्या हसण्याने वादळ पेटलं होतं. आता पुन्हा एकदा रेणुका चौधरी यांच्या हसण्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 1, 2018, 02:47 PM IST
आता राहुल गांधी यांच्या हायलेव्हल मिटींगमध्ये हसल्या रेणुका चौधरी, नेते नाराज title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान कॉंग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांच्या हसण्याने वादळ पेटलं होतं. आता पुन्हा एकदा रेणुका चौधरी यांच्या हसण्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. 

रेणुका चौधरी यांचा हसण्याचा किस्सा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षातील नेत्यांची एक हाय लेव्हल मिटींग बोलवली होती. मिटींगमध्ये राहुल गांधी सर्व नेत्यांची संवाद साधत होते. अशातच रेणुका चौधरी अचानक हसल्या.

पक्षाचे नेते झाले नाराज

नवभारत टाईम्समध्ये दिलेल्या वृत्तानुसार, मिटींगमध्ये उपस्थित कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मिटींगमध्ये जसेही राहुल गांधी म्हणाले की, पक्ष सध्या बिकट परिस्थीतीतून जात आहे आणि सर्व नेत्यांना ही स्थिती बदलण्यासाठी आपलं बेस्ट द्यावं लागेल. राहुल जसेही हे म्हणाले, तेव्हा रेणुका चौधरी जोरजोरात हसू लागल्या. रेणुका यांचं हसणं ऎकताच मिटींगमधील सर्वच नेते शांत आणि गंभीर झाले. तसेच यामुळे पक्षातील अनेक मोठे नाराज झाल्याचेही बोलले जात आहे. 

राहुल यांचं भाषण अपूर्ण

बोलताना मध्येच हा प्रकार घडल्याने राहुल गांधी आपलं भाषण अर्धवट सोडूनच खाली नसले. अशीही माहिती आहे की, राहुल खाली बसल्यावरही रेणुका यांचं हसणं काही थांबलं नाही. पण जेव्हा त्यांना याची चुणूक लागली तेव्हा वेळ निघून गेली होती. पक्षाच्या एका नेत्यांनी सांगितले की, मिटींगमध्ये रेणुका यांच्या अशा हसण्याने राहुल गांधी नाराज आहेत. तसेच रेणुका चौधरी यांना पुन्हा कोणत्याही मिटींगमध्ये न बोलण्याचही बोललं गेलं. 

मोदींच्या भाषणावेळी रेणुकांचं हसू

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळीही रेणुका चौधरी यांच्या हसण्यामुळे वाद पेटला होता. अर्थसंकल्प सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण देत होते. त्याचवेळी रेणुका चौधरी जोरात हसल्या. भाजपकडून यावर मोठी टीका झाली होती. तेच नरेंद्र मोदी यांनीही रेणुका चौधरी यांनी जोरदार टीका केली होती.