गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांचा दे धक्का, भाजपची साथ

गुजरात काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाचा हात सोडून, भाजपची साथ धरली आहे. गांधीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बलवंतसिंग राजपूत, पी आय पटेल आणि तेजश्री पटेल या तिघा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

Updated: Jul 27, 2017, 10:41 PM IST
गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांचा दे धक्का, भाजपची साथ title=

गांधीनगर : गुजरात काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाचा हात सोडून, भाजपची साथ धरली आहे. गांधीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बलवंतसिंग राजपूत, पी आय पटेल आणि तेजश्री पटेल या तिघा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

या तिघांना राज्यसभेचं तिकीट दिलं जाणार आहे. या आधी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. विशेष म्हणजे काँग्रेसमधले शंकरसिंग वाघेला यांचे निकटवर्ती मानले जाणाऱ्या तिघा आमदारांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे, गुजरातमध्ये काँग्रेसचं आऊटगोईंग सुरु झाल्याचं बोललं जातंय.