योगदिनाच्या दिवशी काँग्रेसचं 'शवासन'

ज्या राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात, त्या मध्यप्रदेश सरकारनं मात्र अद्याप काहीही पाऊल उचललेलं नाही.

Updated: Jun 21, 2017, 10:10 PM IST
योगदिनाच्या दिवशी काँग्रेसचं 'शवासन' title=

भोपाळ : ज्या राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात, त्या मध्यप्रदेश सरकारनं मात्र अद्याप काहीही पाऊल उचललेलं नाही. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान योगासनं करत असताना काँग्रेसनं मात्र केवळ 'शवासन' करत राज्य सरकारचा निषेध केला.

भोपाळच्या लालपरेड मैदानात मुख्यमंत्र्यांनी योगदिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्याच वेळी काँग्रेसचे नेते पक्षाच्या मुख्यालयात शवासन करत होते. शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी योगदिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.