ट्रोल होत असतांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजांचं काँग्रेसकडून समर्थन

विरोधकांकडून सुषमा स्वराज यांचं समर्थन

Updated: Jun 25, 2018, 03:09 PM IST
ट्रोल होत असतांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजांचं काँग्रेसकडून समर्थन title=

नवी दिल्ली : लखनऊमध्ये एका हिंदू-मुस्लीम दांम्पत्याला पासपोर्ट देण्यावरुन झालेल्या वादावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं. त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली. तर काँग्रेसने सुषमा स्वराज यांच्या समर्थनात ट्विट केलं आहे. सत्ताधाऱ्यांवर टीकेची कोणतीच संधी न सोडणाऱ्या विरोधकांनी सरकारमधील एका मंत्र्यांच्या समर्थनात ट्विट करणं तुम्हाला आश्चर्यकारक वाटलं असेल पण त्या समर्थनात देखील काँग्रेसने सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेसने म्हटलं आहे की, याने काहीही फरक नाही पडत की, परिस्थिती काय आहे. पण यासाठी कोणालाही धमकी नाही दिली जाऊ शकत किंवा आक्षेपार्ह भाषेचा वापर नाही करु शकत. सुषमा स्वराजजी आम्ही तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो जे तुम्हाला तुमच्याच पक्षाच्या ट्रोलर्सने दिलं आहे.

सोशल मीडियावर सुषमा स्वराज यांच्यावर अधिकारी मिश्रा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर काही लोकांनी म्हटलं की, मिश्रा हे फक्त आपलं काम करत होते. काही लोकांनी चुकीच्या भाषेतही त्यांच्यावर टीका केली. पण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याचा धैर्याने स्विकार करत काही ट्विट रिट्विट देखील केले.