सतत रडल्यानं आईनं फेकलं कचऱ्यात, बाळाचा मृत्यू

 रडणाऱ्या बाळाला शांत करण्याऐवजी त्याच्या आईने चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्याचा प्रकार समोर आलायं. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 25, 2018, 07:58 PM IST
सतत रडल्यानं आईनं फेकलं कचऱ्यात, बाळाचा मृत्यू title=

नवी दिल्ली : रडणाऱ्या बाळाला शांत करण्याऐवजी त्याच्या आईने चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्याचा प्रकार समोर आलायं. 

२५ दिवसांच बाळ 

दिल्लीतील पूर्व विनोद नगर भागातून हा प्रकार समोर आलाय. या घटनेत २५ दिवसांच्या बाळाचा मृत्यू झालायं.

बाळाच्या सततच्या रडण्याने रागावलेल्या आईने हे भयानक पाऊल उचलले. घरी आल्यावर बाळ हरवल्याचे नाटक ती करू लागली. 

अपहरणाची तक्रार

 शुक्रवारी घटना घडली. मुलीच्या नातेवाईकांनी बाळ हरविल्याची तक्रार पोलिसात केली. तेव्हा अपहरणाची तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मुलगी सापडली. 

मुलीचा मृत्यू 

मुलीला तात्काळ लाल बहाद्दुर शास्त्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. पण शनिवारी मुलीचा मृत्यू झाला. 

महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली. रागाच्या भरात आणि निराशेत हे कृत्य केल्याचे तिने मान्य केले.