जिममध्ये वर्कआऊट करताना तरुणाचा मृत्यू

डेल कंपनीत काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा जिममध्ये वर्कआऊट करताना मृत्यू झाल्याची घटना घडलीये. 

Updated: Jul 16, 2017, 06:33 PM IST
जिममध्ये वर्कआऊट करताना तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली : डेल कंपनीत काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा जिममध्ये वर्कआऊट करताना मृत्यू झाल्याची घटना घडलीये. 

वरुण कुमार असे या तरुणाचे नाव आहे. तो सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करत होता. वर्कआऊट करताना वरुणच्या अचानक छातीत दुखू लागले आणि तो बेशुद्ध झाला. 

मधापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण जिममध्ये ११ वाजल्यापासून होता. वर्कआऊट करताना त्याच्या छातीत जोरात दुखू लागले आणि त्याला घाम फुटला. यामुळे जिम इंस्ट्रक्टरने त्याला थोडा वेळ आराम करण्यास सांगितले. मात्र त्यातच तो बेशुद्ध झाला. त्याला जेव्हा दवाखान्यात नेण्यात आले तेव्हा त्याचे पल्स ४०पर्यंत कमी झाले होते. 

त्याला तातडीने तेथून रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या मते वरुणचा मृत्यू जिममध्ये जास्त वर्कआऊट केल्यामुळे झाला.