नोटबंदीनंतर वर्षभरात जप्त केली ८७ कोटींची रोकड, २६०० किलो सोनं

वर्षभरापूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 10, 2017, 03:28 PM IST
नोटबंदीनंतर वर्षभरात जप्त केली ८७ कोटींची रोकड, २६०० किलो सोनं title=
File Photo

नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.

नोटबंदीनंतर आयकर विभाग, पोलीस आणि सरकारतर्फे अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. नोटबंदीनंतर आतापर्यंत देशभरातील ५९ विमानतळांवर तब्बल ८७ कोटी रुपयांची रोकड आणि २,६०० किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे.

नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे. देशभरातील विमानतळावरील सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफवर असते. अर्थ मंत्रालयाने नोटबंदीनंतर देशभरातील ५९ विमानतळांवर अलर्ट जाहीर केला होता. त्यानंतर केलेल्या करावाईत ही रोकड आणि सोनं जप्त करण्यात आलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, सर्वाधिक रोकड ही मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर ३३ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली तर, ४९८ किलो सोनं जप्त करण्यात आलं.

रिपोर्ट्सनुसार, २६६ किलो चांदीही जप्त करण्यात आली आहे. सीआयएसएफच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व प्रकरणांत अटक करण्यात आलेल्या प्रवाशांना पुढील कारवाईसाठी आयकर विभागाकडे सोपवण्यात आलं असून कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.