प्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरांनी लिहून दिले हनुमान चालिसाचा पठण

सोशल मीडियावर सध्या डॉक्टरांची एक केसपेपर व्हायरल होत आहे. यात डॉक्टर हृदय रोगाचे विशेषज्ञ आहे, पण औषधांसह त्यांनी रुग्णाला हनुमान चालिसाचे पठण करण्यास सांगितले आहे. 

Updated: Nov 14, 2017, 08:31 PM IST
 प्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरांनी लिहून दिले हनुमान चालिसाचा पठण

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या डॉक्टरांची एक केसपेपर व्हायरल होत आहे. यात डॉक्टर हृदय रोगाचे विशेषज्ञ आहे, पण औषधांसह त्यांनी रुग्णाला हनुमान चालिसाचे पठण करण्यास सांगितले आहे. 

डॉक्टरांच्या या केसपेपरवरून अनेकांनी त्याची मस्करी केली. अनेक जण तो शेअर करून कमेंट करत आहे. 

काय आहे या केसपेपरमध्ये...

सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या कागदात डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिले आहेत. त्यात त्यांनी औषधांसह खालच्या दोन ओळत म्हटले की, ‘हनुमान चालीसा का पाठ करिए, प्रतिदिन मंदिर में आरती के वक्त जाइए.’

या चिठ्ठीच्या सर्वात वर लिहिले आहे की डॉक्टर फक्त इलाज करतो, पण देव सर्व ठीक करतो. या डॉक्टरांचे नाव आहे. दिनेश शर्मा, ते मेडिसीनमध्ये एमडी आहे. तसेच त्यांनी हृदयरोगात संशोधन केले आहे. 

या चिठ्ठीच्या उजवीकडे मोठ्या अक्षरात लिहिले की मंगळवारी दवाखाना बंद आहे. यावर राजस्थानच्या भरतपूरच्या पत्ता लिहीला आहे. 

डॉ. दिनेश शर्मांनी स्वतः सांगितले की का असे लिहिले... 

डॉ. दिनेश शर्मा भरतपूरच्या जिल्हा रुग्णालयात सिनिअर फिजिशियन म्हणून काम केले आहे. एका टीव्ही चॅनलने या संदर्भात डॉक्टरांशी संपर्क साधल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाला मानसिक दृष्ट्या स्थिर ठेवण्यासाठी हनुमान चालिसाचा पठण करण्यास सांगितले आहे. 

मनोविज्ञानाच्या तज्ज्ञांच्या मते विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून शर्मा यांनी रुग्ण बरे करत असतील. त्यामुळे व्हायरल होणारी चिठ्ठी खरी आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close