5 दिवसाच्या गणपतीसाठी डॉल्बी, डीजेला परवानगी नाही

डॉल्बी आणि डीजेवर बंदी कायम

Updated: Sep 14, 2018, 02:51 PM IST
5 दिवसाच्या गणपतीसाठी डॉल्बी, डीजेला परवानगी नाही

मुंबई : पाच दिवसाच्या गणपती विसर्जना दिवशी डॉल्बी आणि डीजेला परवानगी मिळणार नसणार आहे. सरकारने जुलै २०१७ मध्ये डॉल्बी आणि डीजेवर बंदी घातली होती. या बंदी विरोधात ऑडिओ आणि लाईटनिंग असोसीएशनने याचिका दाखल केली होती. ही याचिका आज उच्च न्यायलयात सुनावणीसाठी आली असतांना कोर्टाने यावर तत्काळ बंदी उठवण्यास नकार देत १९ तारखेपर्यंत सरकारला यावर उत्तर देण्यास सांगितलेले आहे. 

सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी डॉल्बी आणि डीजेवर बंदी बंदी का? लाइव्ह कॉन्सर्ट आणि ताशा ढोलमुळेही आवाज होतो मग आमच्यावर बंदी का? असा प्रश्न उपस्थित केला. सरकारने बंदी घालतांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बंदी घातली असल्याचे सांगितले आहे. पण न्यायालयाचे अशाप्रकारचे कोणतेही निर्देश नसल्याची बाजू याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आज उच्च न्यायालयात मांडली. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close