'स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचे ध्वज वापरु नका!'

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचे ध्वज न वापरण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयानं केलंय.

PTI | Updated: Aug 14, 2018, 07:08 PM IST
'स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचे ध्वज वापरु नका!' title=

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचे ध्वज न वापरण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयानं केलंय. देशाचा तिरंगा लोकांच्या आशा आणि आकांक्षाचं प्रतिक मानला जातो. त्यामुळे जनमानसात त्या राष्ट्रध्वजाचा मान राखला गेला पाहिजे. प्लास्टिकचं विघटन होऊ शकत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनानंतर प्लास्टिकच्या ध्वजाचा योग्य सन्मान राहत नाही. त्यामुळेच असे ध्वज न वापरता कागदी किंवा कापडी राष्ट्रध्वजांना प्राधान्य द्यावं असं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनापत्रात स्पष्ट करण्यात आलंय.