मोदी सरकार देतंय घरबसल्या पैसे कमावण्याची संधी

जर तुमच्याकडे नोकरी नाहीये अथवा पार्ट टाईम जॉब करायचाय तर मोदी सरकार तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देतेय. इंटनेटचा प्रसार झाल्याने सामान्य लोकांना आपल्या जॉब व्यतिरिक्त ज्यादा पैसे मिळवण्याचे स्त्रोत उपलब्ध झाले. डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देणारे मोदी सरकार अशीची पैसे कमावण्याची संधी सामान्यांना देत आहे. 

Updated: Oct 20, 2017, 10:29 AM IST
मोदी सरकार देतंय घरबसल्या पैसे कमावण्याची संधी title=

मुंबई : जर तुमच्याकडे नोकरी नाहीये अथवा पार्ट टाईम जॉब करायचाय तर मोदी सरकार तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देतेय. इंटनेटचा प्रसार झाल्याने सामान्य लोकांना आपल्या जॉब व्यतिरिक्त ज्यादा पैसे मिळवण्याचे स्त्रोत उपलब्ध झाले. डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देणारे मोदी सरकार अशीची पैसे कमावण्याची संधी सामान्यांना देत आहे. 

मोदी सरकार घरबसल्या डेटा एंट्रीद्वारे पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. दिवसातील दोन ते चार तास काम करुन तुम्ही महिन्याला ज्यादा पैसे कमवू शकता. 

सरकारच्या या कामासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारे पैसे गुंतवण्याची आवश्यकता नाही. यासाठी तुमच्याकडे एक कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. 

केंद्र सरकारने लाखो सरकारी फाईल्स तसेच अन्य कंपन्यांच्या फाईल्स डिजिटल रुपात सेव्ह करण्याचे काम सुरु केलेय. या कामासाठी केंद्र सरकारने एक वेबसाईटही सुरु केलीये. यासाठी डिजीटाईज इंडिया पोर्टल सुरु केलंय. येथे रजिस्टर करण्यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड असणे गरजेचे आहे. येथे तुम्हाला ईमेल आयडी, मोबाईल नंबरसह अन्य माहिती देणं गरजेचं आहे. 

रजिस्टर केल्यानंतर तुमच्यासमोर स्निपेट्स येतात. त्यांना तुम्हाला खाली दिलेल्या कॉलममध्ये टाईप करायचे असते. डिजीटाईज इंडिया वेबसाईटच्या मते फाईल्समधील मजकुरांची गोपनीयता कायम राखण्यासाठी माहिती तुकड्यांमध्ये तोडली जाते.