श्रीनगरमध्ये दहशतवादी चकमकीत एक जवान शहीद, दोन जखमी

बाटमालू परिसरात दहशतवादी लपल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. 

Updated: Aug 12, 2018, 07:35 AM IST
श्रीनगरमध्ये दहशतवादी चकमकीत एक जवान शहीद, दोन जखमी  title=

श्रीनगर: श्रीनगरच्या बाटमालू परिसरात रविवारी सकाळी पोलीस आणि दहशतवादी आमनेसामने आले. यावेळी झालेल्या चकमकीत विशेष कारवाई पथकाचा एक जवान शहीद झाला आहे. तर सीमा सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान जखमी झाले आहेत. 

बाटमालू परिसरात दहशतवादी लपल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम सुरु असताना दहशतवाद्यांनी अचानकपणे गोळीबार करायला सुरुवात केली. यामध्ये एसओजीचा एक जवान शहीद झाला तर सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले. याठिकाणी अजूनही कारवाई सुरु असून लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.