खळबळजनक खुलासा: गृह मंत्रालयातील कर्मचारी करत होते पॉर्न डाऊनलोड

माजी गृह सचिव जी. के. पिल्ले यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. जी. के. पिल्ले यांनी केलेला खुलासा ऐकल्यावर सर्वांनाच एक मोठा झटका बसला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील काही कर्मचारी कार्यालयात असलेल्या कम्युटरवर अश्लील पॉर्न पाहत आणि डाऊनलोड करत असत असा खुलासा जी. के. पिल्ले यांनी केलाय.

Sunil Desale | Updated: Apr 12, 2018, 09:41 PM IST
खळबळजनक खुलासा: गृह मंत्रालयातील कर्मचारी करत होते पॉर्न डाऊनलोड title=
Representative Image

नवी दिल्ली : माजी गृह सचिव जी. के. पिल्ले यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. जी. के. पिल्ले यांनी केलेला खुलासा ऐकल्यावर सर्वांनाच एक मोठा झटका बसला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील काही कर्मचारी कार्यालयात असलेल्या कम्युटरवर अश्लील पॉर्न पाहत आणि डाऊनलोड करत असत असा खुलासा जी. के. पिल्ले यांनी केलाय.

सुरक्षा धोक्यात

गृह मंत्रालयातील काही कर्मचारी कार्यालयात असलेल्या कम्युटरवर अश्लील व्हिडिओ डाऊनलोड करत असतं त्यामुळे कॉम्प्युटर नेटवर्कची सुरक्षा धोक्यात येत होती असेही जी. के. पिल्ले यांनी म्हटलं आहे. 

दर दोन महिन्यात बिघाड

डेटा सिक्युरिटी काऊंसिल ऑफ इंडिया (डीएससीआय)चे अध्यक्ष जी. के. पिल्ले यांनी म्हटलं की, "जवळपास आठ-नऊ वर्षांपूर्वी जेव्हा मी केंद्रीय गृह सचिव होतो तेव्हा प्रत्येक ६० दिवसांत कॉम्प्युटरमध्ये गडबड होत असे". 

'या'वेळी कर्मचारी डाऊनलोड करत असत पॉर्न

ज्यावेळी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मिटिंगमध्ये व्यस्त असत तेव्हा इतर कर्मचाऱ्यांना खूप वेळ मिळत असे. ते बैठकीनंतर होणाऱ्या कामाची वाट पाहत असतं. अशा वेळी रिकाम्या वेळेत हे कर्मचारी इंटरनेटवर पॉर्न साईट्स पाहत आणि व्हिडिओज डाऊनलोड करत असत, त्यामुळे कॉम्प्युटरमध्ये वायरस डाऊनलोड होत असे असेही जी. के. पिल्ले यांनी म्हटलयं.

काही दिवसांपूर्वी काही सरकारी वेबसाईट्समध्ये गडबड झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सरकारने स्पष्टीकरण दिलं होतं की, वेबसाईट हॅक झाली नाही तर, हार्डवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अडथळा निर्माण झाला आहे.