एफडी, सेव्हिंगमधून करा मोठी कमाई! कोणती बॅंक देते जास्त व्याज? जाणून घ्या

Bank Intrest Rates:  एसबीआय, पंजाब नॅशनल बॅंक, एचडीएफसी सारख्या बॅंका फिक्स्ड डिपॉझिटमध्ये अधिक व्याज देणाऱ्या स्किम्स घेऊन आल्या आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: May 13, 2024, 08:30 PM IST
एफडी, सेव्हिंगमधून करा मोठी कमाई! कोणती बॅंक देते जास्त व्याज? जाणून घ्या title=
Bank Intrest Rates

Bank Intrest Rates: भविष्यासाठी सुरक्षित रक्कम ठेवायची असेल तर बहुतांश लोक फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय निवडतात. त्यामुळे भारतीय ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी बॅंका नवनव्या स्किम्स घेऊन येत आहेत. एप्रिल महिन्यात भारतीय रिझर्व्ह बॅंकेने  आपल्या रेपो रेटमध्ये कोणता बदल केला नाही. तो 6.5 टक्के इतकाच ठेवला. त्यामुळे बॅंका आकर्षक स्किम्स घेऊन लोकांपर्यंत पोहोचल्या. एसबीआय, पंजाब नॅशनल बॅंक, एचडीएफसी सारख्या बॅंका फिक्स्ड डिपॉझिटमध्ये अधिक व्याज देणाऱ्या स्किम्स घेऊन आल्या आहेत. 

एसबीआय मोड्स 

एसबीआय मोड्स या स्किम्स अंतर्गत ग्राहकाला कोणतेही एक्स्ट्रा चार्ज न देता 1000 च्या मल्टीपलमध्ये पैसे काढता येतील. यासोबतच पैशावरील व्याजात कोणती कपात होणार नाही. या स्किम अंतर्गत कमीत कमी 10 हजार रुपये गुंतवता येतात. तर जास्त रक्कम गुंतवण्याची कोणती सीमा नाही.. एसबीआयच्या ऑनलाईन पोर्टलवर तुम्ही यासाठी खाते उघडू शकता. \

या स्किमच्या अंतर्गत सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 45 दिवसांच्या अवधीपर्यंत 3 टक्के व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के व्याज मिळेल. यानंतर 46 दिवसांपासून 179 दिवसांपर्यंत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 5 टक्के तर सामान्य नागरिकांना 4.50 टक्के व्याज मिळते. 

या स्किम अंतर्गत गुंतवणुकीत 180 ते 210 दिवसांच्या आत ज्येष्ठ नागरिकांना 5.7 टक्के  आणि सामान्य नागरिकांना 5.25 टक्के व्याज मिळेल. असेच एक वर्षासाठी ठेवलेल्या रक्कमेवर 7.30 टक्के, सामान्य नागरिकांना 6.80 टक्के, 2 वर्षाच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के, सामान्य नागरिकांना 7 टक्के व्याज मिळेल.

3 ते 5 वर्षापर्यंतच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के, सामान्य नागरिकांना 6.50 टक्के, 5 ते 10 वर्षाच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के तर सामान्य नागरिकांना 6.50 टक्के व्याज मिळेल. 

पंजाब नॅशनल बॅंक 

पंजाब नॅशनल बॅंक फिक्स्ड डिपॉझिटवर 12 एप्रिल 2024 पासून व्याजदरात काही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार 180 ते 210 दिवसांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 6.8 टक्के, सामान्य नागरिकांना 6.5 टक्के व्याज मिळेल. 
1 वर्षाच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के, सामान्य नागरिकांना 7.25 टक्के, 400 दिवसांच्या वर ज्येष्ठ नागरिकांना 8.5 टक्के, सामान्य नागरिकांना 7.3 टक्के व्याज मिळेल. 

400 दिवसांच्यावर 2 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के तर सामान्य नागरिकांना 7.3 टक्के व्याज मिळेल. 3 वर्षाच्या एफडीवर 1205 दिवसांसाठी ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के तर सामान्यांना 6.5 टक्के व्याज मिळेल.

एचडीएफसी बॅंक

एचडीएफसी फिक्स्ड डिपॉझिटवर सामान्य नागरिकांपेक्षा अधिक 0.5 टक्के ज्येष्ठ नागरिकांना देत आहे. 1 वर्ष ते 15 महिन्यांपर्यतच्या कालावधीसाठी 7.60 टक्के, 2 वर्ष ते 1 महिन्यापर्यंत 7.50 टक्के आणि 3 वर्षे 1 दिवसाच्या कालावधीसाठी 7.50 टक्के व्याज देत आहे.