रामहिमच्या डेऱ्यात बरचं काही, बेकायदा फटाक्यांचा कारखाना आणि...

हरियाणातील बाबा रामरहिमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात झाडाझडतीत अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 9, 2017, 02:58 PM IST
रामहिमच्या डेऱ्यात बरचं काही,  बेकायदा फटाक्यांचा कारखाना आणि... title=

सिरसा : हरियाणातील बाबा रामरहिमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात झाडाझडतीत अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहे. येथे फटाक्यांचा कारखाना बेकायदा सुरु होता. याला शील ठोकण्यात आलेय. तर डेऱ्यातून वैद्यकीय महाविद्यालयात १४ मृतदेह पाठवण्यात आल्याची पुढे आलेय.

डेरा सच्चा सौदा येथे अवैध स्फोटके आणि फटाक्यांचा कारखाना आढळून आला. या कारखान्याला पोलिसांनी टाळे ठोकले आहे. त्यातील स्फोटके आणि फटाके जप्त केलीत. डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची निमलष्करी दल आणि हरियाणा पोलिसांनी आज दुसऱ्या दिवशी तपासणी सुरु केली आहे. काल दिवसभरात रोख रकमेसह अनेक महागड्या वस्तू या मुख्यालयात सापडल्या.

तसेच पोलिसांनी रामरहिमच्या तीन अनुयायांना अटक केली आहे. ५ कोटी खर्च करून हिंसा भडकवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चमकौर सिंह, कर्मजीत आणि दानसिंह अशी त्यांची नावे आहेत. डेरा पंचकुला शाखेचा प्रमुख असलेला चमकौर सिंह हा मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे.

डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात रामरहिम ज्या ठिकाणी ध्यानधारणेला बसायचा त्या ठिकाणचे खोदकाम करण्यात येत आहे. डेरा कार्यालयातून मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. एका व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे. हा अनुयायी असून झडतीदरम्यान मोबाईल फोनमध्ये त्याचे चित्रण करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील वैद्यकीय महाविद्यालयात १४ मृतदेह पाठवण्यात आले होते. हे मृतदेह कुणाचे होते, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.