सीआरपीएफच्या तळावर दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद

संपूर्ण देश आज नववर्षाच्या स्वागताची तयारी करतोय. सारी तरुणाई वनवर्षाच्या स्वागतात मशगुल झालीये. मात्र, याच दरम्यान सीमेवर देशाचं रक्षण करणा-या ५ विरांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती दिलीये.

Updated: Dec 31, 2017, 05:25 PM IST
सीआरपीएफच्या तळावर दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद title=

नवी दिल्ली : संपूर्ण देश आज नववर्षाच्या स्वागताची तयारी करतोय. सारी तरुणाई वनवर्षाच्या स्वागतात मशगुल झालीये. मात्र, याच दरम्यान सीमेवर देशाचं रक्षण करणा-या ५ विरांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती दिलीये.

जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा येथील सीआरपीएफ ट्रेनिंग तळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात चार जवान शहीद झालेत. 

एकीकडे हा अतिरेकी हल्ला झाला असताना पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात लष्कराचा एक जवान शहीद झालाय. 

नियंत्रण रेषेवर राजौरी आणि पुँछ इथं पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय तळांच्या दिशेनं गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. नौशेरा सेक्टरमध्ये लष्कराचा जवान जगसिर सिंग शहीद झालाय.

सीआरपीएफच्या तळावर दहशतवादी हल्ला