कोणत्याही उद्योगपतीचे कर्ज माफ केले नाही - अरूण जेटली

सरकारने काही उद्योगपतींची कर्जे माफ केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. हा आरोप फेटाळून लावत अशा प्रकारे कोणत्याही उद्योगपतींची कर्जे सरकारने माफ केली नाहीत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटले आहे. तसेच, उद्योगपतींच्या कर्जमाफीबद्दल केली जाणारी विधाने केवळ अफवा असल्याचेही जेटलींनी म्हटले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 28, 2017, 07:51 PM IST
कोणत्याही उद्योगपतीचे कर्ज माफ केले नाही - अरूण जेटली title=

नवी दिल्ली : सरकारने काही उद्योगपतींची कर्जे माफ केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. हा आरोप फेटाळून लावत अशा प्रकारे कोणत्याही उद्योगपतींची कर्जे सरकारने माफ केली नाहीत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटले आहे. तसेच, उद्योगपतींच्या कर्जमाफीबद्दल केली जाणारी विधाने केवळ अफवा असल्याचेही जेटलींनी म्हटले आहे.

सत्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे

अर्थमंत्री जेटली यांनी लिहीलेल्या एका स्तंभात उद्योगपतींच्या कर्जमाफीबद्दल आलेल्या वृत्ताचे खंडन केले. जेटली यांनी म्हटलंय की, गेल्या काही काळापासून सरकराने उद्योगपतींची कर्जे माफ केल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत. पण, प्रत्यक्षत सरकारने अशा प्रकारे कोणत्याही उद्योगपतींची कर्जे माफ केली नाहीत. या सर्व अफवा असून, सत्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. पुढे जेटली यांनी असेही म्हटले की, 2008 ते 2014  या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी किती कर्जे वाटली? जी आज एनपीएमध्ये बदलली, याचाही शोध घ्यायला हवा, असे जेटली म्हणाले.

अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी व्हावी

सरकारने निर्णय घेतला नसतानाही काही घटक अफवा पसरवत आहेत. अशा मंडळींना विचारायला हवे की, 2008 ते 2014 या काळात सार्वजनीक बॅंकांनी कोणाच्या दबावाखाली या कर्जांचे वाटप केले. तसेच, त्या मंडळींना हेही विचारायला हवे की, या कर्जांची किती वसूली झाली. त्यावर किती व्याज मिळाले. तसेच, त्याची किती लोकांनी परतफेड केली? तसेच, अशा कर्जदारांवर तेव्हा तत्कालीन सरकारने काय कारवाई केली. 

कोणाचेही कर्ज माफ नाही

जेटलींनी पुढे म्हटले आहे की, सरकारने अधिक एनपीए डिफॉल्टर्सचे कोणत्याही प्रकारचे कर्ज माफ केले नाही. नव्या इन्सॉल्वेंसी अॅण्ड बॅंकरप्ट्सी कोड अंतर्गत 12 सर्वात मोठ्या डिफॉल्टर्सची नियोजनबद्ध पद्धतीने वसुलीची कारवाई सुरू असल्याचेही जेटलींनी सांगितले आहे.