गणेश चतुर्थी : भारतातील 10 प्रसिद्ध गणपतीचे मंदिर

भारतातील 10 लोकप्रिय मंदिर 

गणेश चतुर्थी : भारतातील 10 प्रसिद्ध गणपतीचे मंदिर

मुंबई : कुणी त्याला गणेश म्हणतो, तर कुणी एकदंत... काहींना तो विनायक वाटतो तर काहींना गजानन.. मात्र या साऱ्या भक्तांचा बाप्पा एकच आहे. 'गणपती बाप्पा मोरया' अवघ्या 1 दिवसावर या बाप्पाचं आगमन आहे. सगळीकडे एक वेगळाच उत्साह आणि आनंद आहे या बाप्पाच्या आगमनाचं. आज आम्ही तुम्हाला भारतातील 10 प्रसिद्ध गणेश मंदिरांची माहिती देणार आहे. 

1) श्री सिद्धीविनायक मंदिर, मुंबई 

पहिला बाप्पा आहे तो आपल्या मुंबईतच विराजमान झाला आहे. भारतात सिद्धीविनायक पहिल्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी दररोज लाखो भक्त दर्शनाकरता येतात. मुंबईतील हे मंदिर साऱ्यांच्याच आकर्षणाचं ठिकाण आहे. बॉलिवूडची मंडळी देखील बाप्पाचे भक्त आहेत. 

2) श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, पुणे 

महाराष्ट्रात सिद्धीविनायक मंदिरानंतर भाविक पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातील बाप्पाची मनोभावे पूजा करतात. या गणरायाच्या दर्शनासाटी भाविक देशभरातून येतात. या मंदिरातील ट्रस्ट हे देशातील सर्वात श्रीमंत ट्रस्टपैकी एक मानली जातते. या मंदिराला श्रीमंत दगडूशेठ नावाच्या एका हलवाईने बनवलं होतं. जेव्हा त्यांच्या मुलाचा प्लेगच्या साथीमध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्याच नावावरून बाप्पाला हे नाव ठेवण्यात आलं आहे. 

3) कनिपकम विनायक मंदिर, चित्तूर 

हे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरूपती मंदिरापासून 75 किमी दूर आहे. हे मंदिर आपल्या प्राचीन ऐतिहासिक शिल्प आणि कलांमुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दर्शनाला येणारे भाविक मंदिरातील कुंडात आंघोळ करतात. भाविकांची अशी आस्था आहे की, येथे आंघोळ करून सर्व पाप धुतले जातात. 

4) मनकुला विनायक मंदिर, पुडुचेरी 

भारतातील सर्वाधिक प्राचीन मंदिरापैकी हे एक मंदिर 1666 साली बांधण्यात आलं आहे. त्याकाळी पुडुचेरी फ्रान्सच्या अक्तारित होतं. या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की, या मंदिरातील गणरायाची मूर्ती ही कुणी तरी समुद्रात फेकली होती. मात्र ती त्याच ठिकाणी प्रकट झाली. इथे ब्रह्मोत्सव आणि गणेश चतुर्थी दरवर्षी आनंदात साजरी केली जाते. 

5) मधुर महागणपती मंदिर, केरळ 

दहाव्या शताब्दीमध्ये बांधलेलं हे मंदिर अतिशय प्राचीन असून मधुवाहिनी नदीच्या किनाऱ्यावर आहे. असं म्हटलं जातं की, या मंदिरातील गणेश मूर्ती ही मातिची ही नाही आणि कोणत्या दगडाची देखील नाही. ही एका वेगळ्याच तत्वापासून बनवलेली मूर्ती आहे. इथे गणपतीच्या मूर्तीसोबतच शिवाची मूर्ती देखील आहे. अशी आख्यायिका आहे की, कोणत्यातरी टीपू सुल्तानने ही मूर्ती नष्ट करण्याचा विचार केला पण या मंदिरातील पवित्र वास्तूने त्याचा हा विचार नष्ट केला. 

6) रणथंबौर गणेश मंदिर, राजस्थान 

जरी वाईल्ड लाईफ पसंत असलेले लोकं रणथंबौर नॅशनल पार्क फिरायला येतात. मात्र इथे येणाऱ्या गणेश भक्तांची संख्या देखील काही कमी नाही. भक्तगण येथील 'त्रिनेत्र' स्वरूपातील गणरायाचं दर्शन घेतात. जवळपास 1000 वर्षे जुनं गणेश मंदिर रणथंबौरच्या किल्यावर सर्वात उंच ठिकाणी आहे. 

7) मोती डूंगरी गणेश मंदिर, जयपूर 

जयपुरच्या सेठ जय राम पालीवाल यांनी 18 व्या शताब्दीमध्ये हे मंदिर बांधल आहे. हे मंदिर छोट्याश्या डोंगरावर असून जयपूर मधील मुख्य टूरिस्ट स्पॉट आहे. इथे जयपुरच्या महाराणी गायत्री देवीचे महल 'मोती डूंगरी पॅलेस' म्हणून आहे. 

8) गणेश टॉक मंदिर, गंगटोक 

गंगटोकच्या प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉटवरील हे मंदिर सुंदर लोकेशनमुळे लोकप्रिय आहे. बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या या ठिकाणचं हे गणपती मंदिर पर्यटकांच खास आकर्षणाचं कारण आहे. 

9) गणपती मंदिर, रत्नागिरी 

या मंदिरातील भगवान गणेशाची मू्र्ती ही उत्तर दिशेत असून याचं मुख पश्चिमेकडे आहे. तेथील स्थानिकांच असं म्हणणं आहे की, ही मूर्ती कुणी स्थापन केली नसून ती स्वतः दगडात प्रकट झाली आहे. 

10) उच्ची पिल्लयार मंदिर, तामिळनाडू 

भारतातील गणेश मंदिरापैकी उच्ची पिल्लयार मंदिर हे एक प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. तामिळनाडू तिरूचिरापल्ली नावाच्या ठिकाणी उंच डोंगरावर हे मंदिर आहे. उंच डोंगरावर असलेला हा बाप्पा अतिशय सुंदर आणि मोहक वाटतो. असं म्हटलं जातं की, या मंदिरांची कथा रावणाचा भाऊ विभीषणशी जोडलेली आहे. विभीषणने इथे गणपतीवर हल्ला केला होता. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close