गोव्यात भाजप सरकारविरोधात काँग्रेस आणणार अविश्वास ठराव

गोव्यात भाजपची चिंता वाढली

Updated: Sep 20, 2018, 11:44 AM IST
गोव्यात भाजप सरकारविरोधात काँग्रेस आणणार अविश्वास ठराव title=

पणजी : गोव्यातला राजकीय पेच अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्यामुळं त्यांच्या जागी नवं नेतृत्व निवडण्याबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. पर्रिकर यांच्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदे्शाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर आणि खासदार नरेंद्र सावईकर या गोव्यातील तिनही खासदारांशी काल दिल्लीत सुमारे अडीच तास चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय निरीक्षक रामलाल आणि बी. एल. संतोष हेदेखील उपस्थित होते. 

मुख्यमंत्रीपदासाठी श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि सभापती प्रमोद सावंत यांची नावं चर्चेत आहेत. घटकपक्षांना तोडगा मान्य झाला नाही, तर विधानसभा विसर्जित करण्याचा पर्यायदेखील भाजपकडे आहे. अन्यथा, मुख्यमंत्रीपद पर्रिकरांकडेच सोपवून कारभार घटकपक्षांकडे सोपवण्याचाही पर्याय आहे. त्याचवेळी सरकार स्थापनेची संधी मिळाली नाही, तर सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत काँग्रेस आहे.