सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर

सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 10, 2018, 08:32 PM IST
सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर title=
Representative Image

नवी दिल्ली : सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

सोन्याच्या किंमतीत वाढ

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 

सोनं महागलं

दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३१,४५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.

चांदीही चमकली 

एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात २६५ रुपयांनी वाढ होत ३९,६५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात ०.११ टक्क्यांची वाढ होत ते १,३२३.१० डॉलर प्रति औंसवर पोहोचले.