सोनं-चांदीच्या मागणीत घट झाल्याने दरातही झाली घट

सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.

Updated: May 26, 2018, 06:31 PM IST
सोनं-चांदीच्या मागणीत घट झाल्याने दरातही झाली घट title=
File Photo

नवी दिल्ली : सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.

नागरिकांना दिलासा

सोन्याच्या मागणीत घट झाली असून या घटीमुळे सोन्याची किंमत घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोन्याच्या दरात घसरण

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.

सोनं झालं स्वस्त

सोन्याच्या किंमतीत २१० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ३२,२७० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीच्या दरातही घट

सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर चांदीही स्वस्त झाली आहे. चांदीच्या दरात ३५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ४१,२०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.