सोनं-चांदीच्या दरात घसरण

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 18, 2018, 09:12 PM IST
सोनं-चांदीच्या दरात घसरण title=
Representative Image

नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोन्याच्या दरात घसरण

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.

पाहा किती आहे प्रति तोळा दर

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमचा दर ३०,९५० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीचा दरही घसरला

सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात २७० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३९,८०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात १५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३०,९५० रुपये आणि ३०,८०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.