सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरला

आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घट झाली आहे. या घसरणीनंतर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 29,425 रुपयांवरून आज 29,370 रुपयांवर घसरला.

Updated: Jun 11, 2017, 02:21 PM IST
सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरला title=

मुंबई : आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घट झाली आहे. या घसरणीनंतर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 29,425 रुपयांवरून आज 29,370 रुपयांवर घसरला.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर पुन्हा पुन्हा मजबूत झाले आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात घट झाली आहे. याशिवाय, स्थानिक सराफा बाजारात सोन्याची मागणीही कमी झाली आहे. याचा परिणाम घरगुती बाजारात सुद्धा दिसून येत आहे.

दिल्लीत 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचे अनुक्रमे 55,9370 आणि 29,220 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 175 रुपयांनी कोसळून 29,425 रुपये दहा ग्रॅम झाला. त्याच वेळी, गेल्या दोन दिवसांत दर 370 रुपयांची घसरण झाली आहे.