लग्नसराईच्या मोसमामुळे सोन्याच्या दरात वाढ

सध्या लग्नसराईचा मोसम सुरु आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणीही वाढलीये. 

Updated: Nov 10, 2017, 07:33 PM IST
लग्नसराईच्या मोसमामुळे सोन्याच्या दरात वाढ

मुंबई : सध्या लग्नसराईचा मोसम सुरु आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणीही वाढलीये. 

दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात ८० रुपयांची वाड होत ते प्रतिग्रॅम ३०,५३० रुपयांवर पोहोचले. एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात १२५ रुपयांची घट होत ते ४०,५७५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले.

सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात वाढ झालीये. न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी सोन्याच्या दरात ०.२१ टक्क्यांनी वाढ होत ते १,२८३.५० डॉलर प्रति औंसवर बंद झाले. तीन आठवड्यातील हा सर्वाधिक स्तर होता. 

दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे ३०,५३० रुपये आणि ३०,३८० रुपये प्रति ग्रॅम होते. चांदीच्या दरात १२५ रुपयांची घसरण होत ते ४०,४७५ रुपये प्रति किलोवर पोहोचले.