इस्रायल-इराण युद्धामुळे सोनं तापलं?, 10 ग्रॅमची सोन्याची किंमत किती?

Gold-Silver Price Today: . मिडल ईस्टमध्ये भू राजकीय तणाव वाढल्यानंतर सोन्याच्या किंमती वाढत आहेत. जगात युद्धजन्य परिस्थिती आली की सोन्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो.

Pravin Dabholkar | Updated: Apr 19, 2024, 01:36 PM IST
इस्रायल-इराण युद्धामुळे सोनं तापलं?, 10 ग्रॅमची सोन्याची किंमत किती?  title=
Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today: आज दिवसाच्या सुरुवातील सोन्याच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळाल्या. पण 10 वाजल्यानंतर सोन्याच्या किंमतीत उतार पाहायला मिळाला. आज मल्टी मीडिया कमोडीटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव सर्वसाधारण उतारासह ट्रेड करतोय. सोन्याच्या किंमतीत उतार झाल्यानंतरही किंमत 72 हजारच्या वर आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याचे भाव मंदावलेले पाहायला मिळाले. याचा घरगुती बाजारावर परिणाम पाहायला मिळाला. मिडल ईस्टमध्ये भू राजकीय तणाव वाढल्यानंतर सोन्याच्या किंमती वाढत आहेत. तेहरानमध्ये इस्रायलच्या मिसाइल हल्ल्यानंतर मध्य पूर्वमध्ये तणाव वाढला आहे. यामुळे इराण-इस्रायल युद्धाला वेग मिळाला आहे. ज्याच्या सोन्याच्या किंमतीवर परिणाम दिसेल,असे  एचडीएफसी सिक्योरिटीच्या कमोडीटी आणि करन्सी प्रमुख अनुज गुप्ता यांनी सांगितले. 

सोन्यामध्ये हलकी गिरावट 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर दिवसाच्या 10.30 वाजता सोन्याच्या भावात 0.06 टक्के उतार पाहायला मिळाला. यामुळे उतारासह सोन्याचा दर प्रति 10 ग्राम 72 हजार 636 रुपये होता. याशिवाय निफ्टी इंडेक्स 0.11 टक्के उताराहसह 89 हजार 179 रुपये प्रति किलोग्राम राहिला. 

ग्लोबल मार्केटमध्ये सोन्या-चांदीचा भाव 

ग्लोबल मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीत नरमी पाहायला मिळालली. कॉमेक्सवर सोने 2,394 डॉलर प्रति अंशच्या लेव्हलवर आहे. तर 2,398 इतकी गोल्ड क्लोझिंग राहिली. कॉमेक्सवर चांदीचा भाव 28.31 डॉलर खुला झाला. याची आधीची क्लोझिंग 28.38 डॉलर इतकी राहिली. 

ग्लोबल फर्मने काय वर्तवला अंदाज?

ग्लोबल फर्म गोल्डमन सैक्सच्या रिपोर्टनुसार, या वर्षाच्या शेवटीपर्यंत सोन्याचा भाव 2700 डॉलर प्रति अंशाच्या वर जाऊ शकतो. आधी हा अंदाज 2300 डॉलर प्रति अंश होते. काही एक्स्पोर्टच्या म्हणण्यानुसार ग्लोबल मार्कटमध्ये सोन्याचा भाव 3000 डॉलर प्रति अंशच्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतो. 

इस्रायल-इराण युद्धाचा सोन्यावर किती परिणाम?

इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळेल. भविष्यातील अस्थिरता पाहता सोन्यातील गुंतवणूक वाढेल. मागणी जास्त असल्याने पुरवठा करण्यास अडचणी येऊ शकतात. अशावेळी किंमती वाढणे स्वाभाविक आहे. सोने हे नेहमी सुरक्षित गुंतवणूक मानले जाते.  

जेव्हा जगातील देशांमध्ये युद्धाची स्थिती असते तेव्हा सोन्याचे भाव वाढत राहतात. सुरक्षित गुंतवणूक असल्याने सोन्याची किंमत वाढत जाते. युद्धाच्या स्थितीमुळे लोन गोल्डमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते. युद्धजन्य परिस्थितीत स्टॉक मार्केट क्रॅश होऊ शकते पण सोन्याचे भाव वाढतच जातील.