सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण

सध्या देशभरात लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि त्यातच अक्षय्य तृतीयेचाही मुहूर्त जवळ येत आहे. या लग्नसराईत आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Updated: Apr 13, 2018, 05:00 PM IST
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण title=
Representative Image

नवी दिल्ली : सध्या देशभरात लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि त्यातच अक्षय्य तृतीयेचाही मुहूर्त जवळ येत आहे. या लग्नसराईत आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

सोनं-चांदीच्या दरात घसरण

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाल्याचं पहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.

किती आहे प्रति तोळा दर

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत शुक्रवारी ३५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ३१,८०० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीच्या दरातही घसरण

सोन्याच्या दरात घसरण झाली असतानाता चांदीच्या दरातही २५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदी ३९,७५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.

नागरिकांसाठी आनंदाची बातमी

सोन्याच्या मागणीत घट झाली आहे यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

लग्नसराईत आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घसरण

व्यापाऱ्यांच्या मते, स्थानिक बाजारात सोनं-चांदीच्या मागणीत झालेल्या घसरणीमुळेही सोन्याच्या दरात घट झाली आहे. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात ३५० रुपये घट झाल्याने त्याचे दर क्रमश: ३१,८०० रुपये ३१,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहेत.