गुडन्यूज : हॉटेलमधील खाणे झाले स्वस्त, जीएसटीत कपात

खवय्यांसाठी ही चांगली बातमी. सर्व प्रकारच्या रेस्टराँमध्ये आता जीएसटी कमी द्यावा लागणार आहे. याआधी १८ टक्के जीएसटी द्यावा लागत होता. त्यामुळे हॉटेलमधील खाणं स्वस्त झाले आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 10, 2017, 08:32 PM IST
गुडन्यूज : हॉटेलमधील खाणे झाले स्वस्त, जीएसटीत कपात

नवी दिल्ली : सर्व प्रकारच्या रेस्टराँमध्ये आता पाच टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. याआधी १८ टक्के जीएसटी द्यावा लागत होता. त्यामुळे हॉटेलमधील खाणं स्वस्त झाले आहे.

जीएसटी काऊंसिलने हॉटेलमधील जेवणावरील जीएसटी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. एसी, नॉन एसी रेस्टराँच्या जीएसटीमध्ये मोठी घट करण्यात आलेय. त्यामुळे रेस्टराँना यापुढे इटपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेता येणार नाही. १५ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार आहे. त्यामुळे तुम्ही एकाद्या पार्टीचे आयोजन करत असाल तर १५ तारखेपर्यंत थोडीशी कळ काढा. अन्यथा १८ टक्क्यांप्रमाणे जीएसटी द्यावा लागेल.

दरम्यान, सकाळी गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या जीएसटी परिषदेतून सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने काही वस्तूंना २८ टक्क्याच्या स्लॅबमधून वगळले आहे. आता केवळ ५० वस्तूंवरच २८ टक्के जीएसटी कर लागणार आहे. सरकारने जीएसटीमध्ये तब्बल १० टक्क्यांनी कपात केली आहे. सरकारने हा निर्णय घेऊन सर्वसामान्य जनता आणि व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

असे मानले जात होते की, जीएसटी परिषदेतून लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ टक्के स्लॅबमधून  अनेक वस्तू हटवल्या जाऊ शकतात. झी बिझनेसच्या वृत्तानुसार, एकूण २२७ प्रॉडक्टमधील १७४ वस्तूंवरील जीएसटी घटवला गेलाय. म्हणजे केवळ ५० वस्तूंवरच २८ टक्के जीएसटी लागणार आहे. सरकारने १७४ वस्तूंवरील २८ टक्के जीएसटी घटवून १८ टक्के केलाय.

जाणकारांनुसार, प्रॉडक्ट स्वस्त करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असेल. याचा परिणाम गुजरात निवडणुकीत बघायला मिळणार आहे. यासोबतच जानेवारी २०१९ पर्यंत ७ राज्यांमध्ये होणा-या निवडणुकांवरही याचा प्रभाव पडेल. 

या वस्तू होणार स्वस्त-

च्युइंगम
चॉकलेट
टाईल्स
शॅम्पू
साबण, डिटरजंट
लेदर प्रॉडक्ट
पॉलिश
स्टील सेनेट्रिवियर
प्लायवूड
रेजर 
टूथपेस्ट
हेअर ऑईल
सिलिंग फॅन

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close