जॉब सर्चसाठी गुगलचा नवा पर्याय ; आता घरबसल्या मिळेल नोकरी

इंटरनेट सर्च जाईंट गूगलने जॉब सर्चसाठी नवीन फिचर सुरू केले आहे. 

Updated: Apr 25, 2018, 06:11 PM IST
जॉब सर्चसाठी गुगलचा नवा पर्याय ; आता घरबसल्या मिळेल नोकरी title=

मुंबई : इंटरनेट सर्च जाईंट गूगलने जॉब सर्चसाठी नवीन फिचर सुरू केले आहे. यावरुन उमेदवारांना नोकरी शोधणे सोपे होईल. यासाठी कंपनीने जॉब एजेंन्सींसोबत करार केला आहे. या फिचरच्या मदतीने फक्त नोकरी शोधता येणार नाही तर वेगवेगळ्या पोर्टलवर जॉबसाठी अर्ज करता येईल. यातून प्रसिद्ध जॉब साईट्स आणि कंपन्यांमधील नोकऱ्यांबद्दल माहिती मिळेल. गुगल इंडियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्हाला माहित आहे की, लोक नोकरी शोधण्यासाठी सर्च करतात. गेल्या वर्षी आम्ही गुगलवर जॉब सर्च फिचरमध्ये 45% वाढ केली होती आणि यात सातत्याने वाढ होत आहे.

मात्र त्यातूनही अधिक फायदा होताना दिसत नाही. तर दुसरीकडे कंपन्या विशेषकरुन लहान कंपन्या जे सर्वात अधिक जॉब देतात त्यांना प्रभावीपणे जाहिरात करता येत नाही. त्यामुळे हे नवे सर्च एक्सपीरिएंस यात त्यांची मदत करेल.

कसे कराल जॉब सर्च?

गुगल सर्चमध्ये जॉब्स नियर मी (jobs near me) यांसारखे पासवर्ड डाकल्यास गुगलचा एक नवा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यात जॉबची सूची दिसेल आणि त्यावर क्लिक करुन तुम्ही आवेदन करु शकता. एक जॉब वेकेंसीवर क्लिक केल्यास समोर अनेक ऑप्शन्स दिसतील. त्यात सर्वात आधी जॉबबद्दल लिहिले असेल. त्यानंतर पात्रता दाखवली जाईल. त्याचबरोबर कोणत्या वेबसाईटवर असेल याची माहिती देखील असेल. इथे सेव्हचे ऑप्शनही असेल त्यामुळे नंतरही तुम्ही ते पाहु शकाल. आवेदनवर क्लिक केल्यावर जॉब पोस्ट केलेली वेबसाईट ओपन होईल.

नको असलेल्या जाहिराती स्मार्ट फिल्टरच्या मदतीने टाळता येतील

जॉब सर्च करताना तुम्ही तुमचा प्राधान्यक्रम ठरवू शकता. म्हणजे पार्ट टाईम, फुल टाईम, लोकेशन, जॉब टायटल आणि अनुभव. कंपनीने यात स्मार्ट फिल्टर दिला आहे त्यामुळे सर्च रिफाईन होईल. यात अलर्टचा ऑप्शनही आहे, ज्याद्वारे नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला योग्य जॉबचा मेल येईल. अलर्टमध्ये सर्चच्या आधारावर नोटिफिकेशन असतील. गुगल जॉब सर्चमध्ये मागील दिवस, मागील ३ दिवस, मागील आठवडा आणि मागचा महिन्यांपर्यंत निघालेल्या नोकऱ्यांची माहिती मिळेल.

गेल्या वर्षी केली होती घोषणा

गेल्या वर्षी गुगलने भारतात जॉब सर्च फिचर लॉन्च करणार असल्याचे सांगितले होते. गुगलच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फ्रेंसमध्ये ही घोषणा करण्यात आली होती. यात लोकेशन, स्किल्स, एंप्लायर आणि जॉब पोस्टींगसारखे फिल्टर्सच्या आधारावर रिजल्ट मिळतील. यात गुगल एंप्लायर कंपनीला रेटिंगही देईल.