जीएसटी : पाहा कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त

जीएसटी काउंसिलने सर्व्हिसेसवर 4 वेगवेगळ्या टॅक्स स्लॅब लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि आरोग्य यावर नवीन कर प्रणालीत कोणताही टॅक्स नाही लागणार. तर काही सेवा स्वस्त होतील तर काही महाग. दूरसंचार, विमा, हॉटेल आणि रेस्टॉरंटसह विविध सेवांसाठी 4 वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स स्लॅब बनवले आहेत. ते 5, 12, 18 आणि 28 टक्के असे असणार आहे. जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार आहे.

Updated: Jun 29, 2017, 02:12 PM IST
जीएसटी : पाहा कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त title=

नवी दिल्ली : जीएसटी काउंसिलने सर्व्हिसेसवर 4 वेगवेगळ्या टॅक्स स्लॅब लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि आरोग्य यावर नवीन कर प्रणालीत कोणताही टॅक्स नाही लागणार. तर काही सेवा स्वस्त होतील तर काही महाग. दूरसंचार, विमा, हॉटेल आणि रेस्टॉरंटसह विविध सेवांसाठी 4 वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स स्लॅब बनवले आहेत. ते 5, 12, 18 आणि 28 टक्के असे असणार आहे. जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार आहे.

या गोष्टींवर लागणार कमी टॅक्स

- इंसुलिनवर 12% ऐवजी 5%

- शाळेच्या बॅगेवर 28% ऐवजी 18%

- एक्सरसाईज बुक्स 18% ऐवजी 12%

- संगणक प्रिंटर 28% ऐवजी 18%

- अगरबत्तीवर 12% ऐवजी 5%

- काजूवर 12% ऐवजी 5%

- डेंटल वॅक्सवर 28% ऐवजी 8%

- प्लास्टिक बेडस्पर 28% ऐवजी 18%

- प्लास्टिक टर्पोलिनवर 28% ऐवजी 18%

- चित्रकलेची वही 12% ऐवजी 0 %

- प्री-कोस्ट कॉक्रिट पाईपवर 28% ऐवजी 18%

- कटलरीवर 18% ऐवजी 12%

- ट्रॅक्टर संबधित वंस्तूवर 28% ऐवजी 18%