गुजरात विधानसभा 2017: कॉंग्रसेने जाहीर केली 77 उमेदवारांची पहिली यादी

गुजरात विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीचा खेळ आता मध्यावर येऊन ठेपला आहे. सत्ताधारी भाजपची प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीची पहिली यादी आज (रविवार, 19 नोव्हेंबर) जाहीर केली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 19, 2017, 11:39 PM IST
गुजरात विधानसभा 2017: कॉंग्रसेने जाहीर केली 77 उमेदवारांची पहिली यादी title=

अहमदाबाद : गुजरात विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीचा खेळ आता मध्यावर येऊन ठेपला आहे. सत्ताधारी भाजपची प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीची पहिली यादी आज (रविवार, 19 नोव्हेंबर) जाहीर केली.

पहिल्या यादीत 77 उमेदवार

दरम्यान, कॉंग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 77 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात काही नावे अपेक्षीत तर, काही अनपेक्षीत नावांचा समावेश आहे. तर, काही उमेदवारांच्या जागांमध्ये बदल करण्यात आला आहे. कॉंग्रेस उमेदवारांची एक यादी या आधीही जाहीर झाली होती. मात्र, ती यादी खोटी असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले होते. खोटी यादी प्रसारीत करण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला होता. पक्षाने आज जाहीर केलेली यादी ही अधिकृत यादी म्हणून जहीर करण्यात आली आहे

 

 

कॉंग्रेस आणि PAASमध्ये एकमत

दरम्यान, कॉंग्रेस आणि PAASमध्ये सहमती झाली आहे. कॉंग्रेस सोबत हार्दिक पटेल यांची दिलजमाई झाली असून, हार्दिक पटेल आपली भूमिका उद्या जाहीर करणार आहेत. मात्र, हार्दिकचे उमेदवार कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असून, हार्दिकच्या वाट्याला 10 ते 12 जागा येणार असे जवळपास निश्चित झाले आहे.

तिकीट मिळाल्यावर पाटीदार आंदोलन समितीचा राजिनामा

हार्दिकच्या वतीने पाटीदार समाज आंदोलन समितीचे नेते ललीत वसोया, बोटादमधून  दिलीप साबवा, मोरबीतून मनोज पनारा, पाटणमधून कीरीट पटेल, महिला कन्विनर गीता पटेल समितीचा राजीनामा देणार आहेत. हा राजीनामा तिकीट मिळाल्यानंतर दिला जाईल. तसेच, पाटीदार आंदोलनात हे सर्व नेते हार्दिक पटेल यांच्या सोबत असतील.

भाजपची दुसरी यादीही जाहीर

दरम्यान, भाजपने आपली पहिली दुसरी यादीही शनिवारी जाहीर केली. भाजपने आतापर्यंत 106 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत 70 उमेदवार होते.