कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण 77 उमेदवारांचा समावेश आहे. जाणून घ्या कॉंग्रेसने कोणाला कोठून दिली उमेदवारी.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 19, 2017, 11:41 PM IST
कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत कुणाला कुठून मिळाली उमेदवारी? title=

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण 77 उमेदवारांचा समावेश आहे. जाणून घ्या कॉंग्रेसने कोणाला कोठून दिली उमेदवारी.

कॉंग्रेसने रविवारी जाहीर केलेली यादी अनेकांसाठी अपेक्षीत तर अनेकांसाठी अनपेक्षीत ठरली. उमेदवारी देताना कॉंग्रेसने सावध पावले टाकत अनेक निकष लावले दिसून येतात. त्यामुळे अनेकांचा पत्ता कट झाला आहे तर, अनेकांना धक्कादायक रित्या उमेदवारी मिळाली आहे. या उमेदवारीवरून काही मंडळी नारज तर, काहींमध्ये मोठा जल्लोष पहायला मिळत आहे.